Nashik Latest News Women Returns Money To Owner After Gating 1 Lakh 76 Thousand Rupees In Bank Account Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नाशिक : आजकाल सर्वच जण पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्यासाठी मोबाईल बँकिंगचा उपयोग करतात. तर काहीजण आजही बँकेत जाऊन रीतसरपणे पैसे खात्यात जमा करत असतात. मात्र अनेकदा बँकेत पैसे जमा करताना एखाद्या चुकीमुळे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यात समोर आला आहे. मात्र या घटनेत समोरच्या खातेधारकाने माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण घालून दिले आहे. 

आपल्या अनेकांच्या आयुष्यात बँक खाते अतिशय महत्वाची गरज बनली आहे. बँक खात्याबरोबर अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करत असतात. तर काहीजण मोबाईलपेक्षा बँकेत (Bank Account) जाऊन देवाण घेवाण करत असतात. अशा माध्यमातून अनेकदा दुसऱ्याच खात्यावर पैसे गेल्याचे घडले आहे. अशावेळी एखाद्याच्या खात्यावर अचानक जमा झालेले पैसे त्यालाही पहिल्यांदा प्रश्न पडतो की पैसे नेमके कुठून आले. मात्र सध्या बँकेच्या अनेक सुरक्षित सुविधा असल्याने हे पैसे परत मिळत असतात. कारण खिशातील दहा रुपये जरी इकडे तिकडे झाले आपला जीव कासावीस होत असतो. मात्र नाशिकमध्ये माणुसकी जिवंत असल्याची घटना घडली आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगावमध्ये (Lasalgaon) हा प्रकार घडला असून असताना लासलगाव येथील आबाजी विठ्ठल सोनवणे यांची प्रायव्हेट फंड व इतर मिळणारी रक्कम नाशिक जिल्हा को-ऑपरेटिव्ह भुविकास बँकेतून लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा टाकळी शाखेत कमल आबाजी सोनवणे यांच्या बँक खात्यात 1 लाख 76 हजार 419 रुपये जमा होणार होते. मात्र बँक खात्याचा शेवटचा एक क्रमांक चुकल्याने ते पैसे थेट दुसऱ्या खात्यावर जमा झाले. येवला तालुक्यातील निळखेडे येथील महिला शेतकरी निर्मला भाऊसाहेब कदम यांच्या खात्यामध्ये 1 लाख 76 हजार 419 रुपये ही रक्कम चुकून जमा झाली, हा संपूर्ण प्रकार जून महिन्यातील असून त्याचा आता उलगडा झाला. आता ती महिला कांदा अनुदानाचे (Onion Grant) पैसे काढण्यासाठी गेली असता खात्यावर इतके पैसे पाहून ती चकित झाली. 

असा झाला उलगडा 

याबाबत कांदा उत्पादक शेतकरी निर्मला कदम यांना आपल्या खात्यावर चुकून पैसे पडले असल्याची कुठलीही माहिती नव्हती, आता साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान बँक खात्यामध्ये होणास सुरुवात झाल्याने किती अनुदान आले, याची माहिती घेण्यासाठी त्या लासलगाव येथील बँक ऑफ बडोदा येथे गेल्या होत्या. यावेळी त्यांना इतकी मोठी रक्कम आल्याने सुखद धक्का बसला, पण इतकी रक्कम कशी आली याची सखोल चौकशी केली असता ही रक्कम माझी नसल्याचे सांगत त्यांनी कोणत्या बँक खात्यातून आली आहे. त्याची माहिती घेत संबंधित बँकेशी संपर्क केला. भुविकास बँकेच्या व्यवस्थापक मीना किसन एखंडे यांनी तपासणी केली असता शेवटचा एक क्रमांक चुकल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे लक्षात आले. आबाजी सोनवणे यांच्या पत्नी श्रीमती कमल सोनवणे यांच्याशी संपर्क करत 1 लाख 76 हजार 419 रुपये रक्कमेचा धनादेश कमल आबाजी सोनवणे यांना देत रक्कम अदा केला. या माणुसकीने निर्मला भाऊसाहेब कदम यांचे परिसरात कौतुक होत असून सोनवणे कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले. 

इतर महत्वाची बातमी : 

AI Voice Clone Fraud : तुमच्याच प्रिय व्यक्तीच्या आवाजात बोलून बँक खाते करतील रिकामं, नवा स्कॅम समजून घ्या

[ad_2]

Related posts