[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs AUS 3rd ODI Match Highlights: अखेरच्या वनेड सामन्यात ६६ धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने शेवट गोड केला आहे. राजकोट वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६६ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय संघाला २८६ धावांत रोखले. भारताने अखेरचा सामना गमावला असला तरी मालिकेत २-१ च्या फरकाने विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. रोहित शर्मा आणि वॉशिंगटन सुंदर यांनी दमदार सलामी दिली. दोघांनी दहा षटकात ७४ धावांची सलामी दिली. वॉशिंगटन सुंदर १८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर आजी-माजी कर्णधारांनी डाव सांभाळला. दोघांनीही संघाची धावसंख्या वाढवली. पण भारताची धावसंख्या १४४ झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने ८१ धावांची खेळी केली. रोहितने सहा षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ८१ धावांचे योगदान दिले.
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने अय्यरसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतकानंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने ५६ धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. विराट बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने भारताच्या फलंदाजांनी विकेट फेकल्या. श्रेयस अय्यर ४८ धावा काढून बाद झाला. या खेळीत त्याने एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांना ग्लेन मॅक्सवेल याने तंबूत पाठवले. केएल राहुल २६, सूर्यकुमार यादव आठ, रविंद्र जाडेजा ३५ धावांचे योगदान देऊ शकले.
ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जोश हेजलवूड याला दोन विकेट मिळाल्या. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन आणि सांघा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
Australia salvage a win in the third ODI with a clinical all-round display 💪#INDvAUS 📝: https://t.co/VFCXdpO74l pic.twitter.com/JvhaorkL8U
— ICC (@ICC) September 27, 2023
अखेरच्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात ३५२ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल मार्श याने ९६ धावांची वादळी खेळी केली. तर डेविड वॉर्नर ५६, स्मिथ ७४ आणि लाबुशेन ७२ यांनीही मोठे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह याने तीन विकेट घेतल्या.
[ad_2]