Gill Rahane Jadeja And Shami Wont Be Available Today For Ipl 2023 Final Will Travel To England 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023 Final Match : अहमदाबादमध्ये मुसळधार पावसामुळे आयपीएल 2023 चा (IPL 2023) अंतिम सामना रविवारी स्थगित करण्यात आला. आता चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यातील सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज 29 मे रोजी चेन्नई आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. शुभमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आजच्या सामन्याला मुकणार आहेत, अशा आशयाचं ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गिल, शमी, जडेजा आणि रहाणे अंतिम सामन्याला मुकणार?

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सह क्रिकेट चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागलं होतं, पण, सोमवारी त्यांच्या हिरमोड झाला. दरम्यान, आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या नावाने एक ट्वीट व्हायरल होत आहे. जय शाह यांच्या नावाच्या पॅरोडी अकाऊंट म्हणजेच फेक अकाऊंटवरून केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे. 

सोशल मीडियावरील ‘ते’ ट्वीट व्हायरल

जय शाह यांच्या पॅरोडी अकाऊंटवरून केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘शुभमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे उद्या इंग्लंडला जाणार आहेत. त्यामुळे ते सोमवारी आयपीएल फायनल खेळू शकणार नाहीत.’

आयपीएलनंतर खेळाडू इंग्लंडला रवाना होणार

आयपीएलनंतर टीम इंडियाचं लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर टीम इंडियाचा भाग असलेले खेळाडू इंग्लंडला रवाला होतील. याआधी आयपीएलमधून बाहेर गेलेल्या आठ संघांमधील भारतीय संघाला भाग असलेले खेळाडू इंग्लंडला पोहोचले आहेत. शुभमन गिल, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाचा भाग आहेत.

या फेक ट्वीटवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

 

 

 

 

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :



[ad_2]

Related posts