daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 30 September 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 30 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी आर्थिक मदतीचा ओघ मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती बदलेल. तुमच्या हातून काही मौल्यवान वस्तू निसटू शकतात.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी घरातील वातावरण अधिक प्रसन्न होईल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी कुटुंबातील काही समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला पत्नी आणि मुलांकडून भरपूर प्रेम मिळेल.

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नियोजन करुन खर्च केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी नोकरीत यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना कराल, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. तुमचे रखडलेले पैसेही मिळतील.

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी व्यवसायाशी संबंधित कामासाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. 

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. हवामानामुळं तब्बेतीत चढ-उतार दिसू शकतो. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. राजकारणात असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी समाजातील सर्व लोक तुमचं कौतुक करतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांद्वारे तुम्हाला उत्पन्नाच्या भरपूर संधी मिळतील. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts