World Cup 1975 History And How West Indies Won First Time Team India Performance First Odi World Cup

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 1975 History : क्रिकेटचा महाकुंभ अर्थात आयसीसी विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ही 13 वी विश्वचषक स्पर्धा असेल. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वेस्ट इंडिजने पहिल्या विश्वचषकावर नाव कोरले होते. 1975 मध्ये क्रिकेटचा पहिला विश्वचषक इंग्लंडमध्ये पार पडला होता. 7 जून ते 21 जुलै दरम्यान आठ संघामध्ये विश्वचषकाचा थरार रंगला होता. आठ संघांना दोन गटात विभागले होते. दोन ग्रुपमधील आघाडीचे दोन संघ सेमीफायनलमध्ये होते, त्यांच्यामध्ये फायनलचा थरार झाला होता. 

पहिला विश्वचषकावेळी 60 षटकांचे सामना असायचे. एकूण 120 षटकांचा खेळ असल्यामुळे सर्व सामने लवकर सुरु व्हायचे…  आठ संघामध्ये विश्वचषक स्पर्धा रंगली होती. दोन ग्रुपमध्ये आठ संघांना विभागले होते.

ग्रुप अ – 

इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि ईस्ट अफ्रिका 

ग्रुप ब – 

वेस्टइंडीज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका. 

भारताच्या नावावर लाजीरवाणा विक्रम – 

या विश्वचषकात भारतीय संघाने साधारण कामगिरी केली. भारताला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. इंग्लंडविरोधातील सामन्यात सुनील गावसकरांची संथ खेळीवर टीका झाली होती. गावसकरांनी 60 षटके फलंदाजी करुन फक्त 36 धावा केल्या होत्या. गावसकरांनी 174 चेंडूचा सामना करत फक्त एका चौकाराच्या मदतीने 36 धावा केल्या होत्या. इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानात  प्रथम फंलदाजी करताना 60 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 334 धावा केल्या होत्या. डेनिस एमिस याने 137 धावांची खेळी केली होती.  प्रत्युत्तरदाखल भारतीय संघाला 60 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 132 धावाच करता आल्या. गावसकरांनी 174 चेंडूत फक्त 36 धावांची खेळी केली. गावसकर 60 षटके फलंदाजी करत नाबाद राहिले. याच सामन्यात विश्वनाथ गुंडप्पा यांनी सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. गुंडप्पा विश्वनाथ यांनी फक्त 59 चेंडूत 37 धावा जोडल्या होत्या. वनडे क्रिकेटचा विरोध करण्यासाठी गावसकरांनी संथ खेळी केल्याचे बोलले जातेय. या विश्वचषकाच भारतीय संघाची धुरा श्रीनिवास वेंकटराघवन यांनी सांभाळली होती. 1975 च्या विश्वचषकात भारतीय संघाला ईस्ट आफ्रिका विरोधात विजय मिळवता आला. भारताने ईस्ट आफ्रिकेला दहा विकेटने पराभूत केले. या सामन्यात गावसकरांनी 86 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी केली. यामध्ये नऊ चौकारांचा समावेश होते. भारतीय संघाला इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे टीम इंडियाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. 

ग्रुप अ मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर ग्रुप ब मधून वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये जागा मिळवली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिली सेमीफायनलची लढत झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. तर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यानंतर फायनल सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करत पहिल्यावाहिल्या चषकावर नाव कोरले. 

सेमीफायनलमध्ये काय झालं ?

इंग्लंडचा चार विकेटने पराभव करत ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 93 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाने सहा विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. 

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजने न्यूझीलंडचा पाच विकेटने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 158 धावा केल्या होत्या. विंडिजने हे आव्हान पाच विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. कालीचरणने 72 आणि ग्रीनिजने 55 धावांची दमदार खेळी केली. 

फायनलमध्ये काय झालं ?

1975 विश्वचषक स्पर्धेची फायनल लढत लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडली होती. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रोमांचक झाला. क्लाइव लॉयड यांनी पहिला विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला. वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 17 धावांनी पराभव केला. प्रथम फंलदाजी करताना वेस्ट इंडिजने 60 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 291 धावा केल्या होत्या. कर्णधार क्लाइव लॉयड यांनी  102 धावांची शतकी खेळी केली. तर रोहन कन्हाई यांनी 55 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार पलटवार केला. 58.4 षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव 274 धावांपर्यंत पोहचला. ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज धावबाद झाले होते. 

[ad_2]

Related posts