Hardik Pandya Never Lost An Final Ipl 2023 Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya has never lost an IPL Final : दोन महिन्यापासून सुरु असलेल्या आयपीएल रनसंग्राम आज संपणार आहे. दहा संघामध्ये आयपीएलच्या चषकासाठी स्पर्धा रंगली होती. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायन्स आणि धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आमने सामने असतील. धोनी आयपीएलच्या पाचव्या जेतेपदासाठी मैदानात उतरेल तर हार्दिक पांड्या दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. धोनी दहावी आयपीएल फायनल खेळत आहे… आतापर्यंत नऊ आयपीएल फायनलमध्ये धोनीला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. पण हार्दिक पांड्या आतापर्यंत एकाही आयपीएल फायनलमध्ये पराभूत झालेला नाही. हार्दिक पांड्या आतापर्यंत आयपीएलच्या पाच फायनल खेळला आहे. या सर्व सामन्यात त्या संघाचा विजय झालाय. आज अहमदाबादमध्ये काय होणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

हार्दिक पांड्या आयपीएलच्या एकाही अंतिम सामन्यात हरलेला नाही. हार्दिक पांड्या खेळत असलेला प्रत्येक संघ फायनलमध्ये जिंकलाय. आता हार्दिक पांड्या सहाव्यांदा फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.  हार्दिक पांड्या याने मुंबईच्या संघाकडून चार आयपीएल फायनल खेळलाय. 2015, 2017, 2019, आणि 2020 मध्ये हार्दिक पांड्या मुंबईकडून आयपीएल फायनलमध्ये खेळला आहे. 2022 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात संघाचा कर्णधार झाला. त्यावेळीही गुजरातने अंतिम फेरीत धडक मारली अन् जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यातील हार्दिक पांड्याची ही आकडेवारी गुजरात आणि हार्दिकच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे. पण यावेळी हार्दिकपुढे कॅप्टन कूल एमएस धोनीचे आव्हान आहे. 

पावसामुळे खेळखंडोबा, आजतरी सामना होणार का?

आयपीएलच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामना  रविवारी होणार होता. पण पावसामुळे होऊ शकला नाही. पाऊस थांबेल म्हणून पंच, चाहत्यांसह साऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली पण पाऊस थांबला नाही. त्यामुळे अखेर रविवारचा सामना रद्द करण्यात आला. आता आज, राखीव दिवशी हा सामना खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे, अहमदाबादमध्ये आज हवामान साफ आहे, पावसाची शक्यता नाही. येथील वातावरण ढगाळ असेल पण पावसाची शक्यता नाही. 

रविवारी IPLच्या अंतिम सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसामुळे चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याला ब्रेक लागला. सामना राखीव दिवशी घेण्याचा निर्णय पंचांनी घेतला. पण प्रेक्षकांचा प्रचंड हिरमोड झाला. मैदानात आलेल्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांनी परतीची तिकीट बूक केली होती.. काही जणांनी उघड्यावर रात्र काढली. बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर चाहत्यांची गर्दी झाली होती. रात्रभर चाहते स्टेशनवर झोपले. आता चाहते पुन्हा एकदा नव्या दमाने स्टेडिअमवर आपल्या आवडत्या खेळाडूला पाहायला परतले आहेत. स्टेडिअवर मोठी गर्दी झाली आहे. 

धोनीची चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पांड्याची गुजरात टायटन्स थोड्याच वेळात मैदानात आमने सामने असतील.  यंदाच्या मोसमात दोन्ही फौजा तिसऱ्यांदा आमनेसामने उभ्या ठाकतील. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीतला कदाचित हा अखेरचा आयपीएल सामना ठरण्याची शक्यता आहे..त्यामुळं चेन्नईचे शिलेदार धोनीला विजेतेपदाची भेट देण्याचा निकराने प्रयत्न करतील. दरम्यान, गुजरात टायटन्सनं लागोपाठ दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएलच्या गत मोसमात गुजरातनं राजस्थान रॉयल्सला नमवून विजेतेपद पटकावलं होतं..यंदा त्या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याचा गतविजेत्या गुजरातचा प्रयत्न राहिल. पण यंदा गुजरातसमोर चारवेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नईचं तगडं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नई आणि गुजरात संघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.

[ad_2]

Related posts