Asian Games 2023 Medal Tally India Have 53 Medal Number China Number One

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asian Games 8th Day Highlights : आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. आठव्या दिवशी भारताने तब्बल 15 पदकांची कमाई केली. त्यासोबत भारताच्या पदकांची संख्या 50 पार पोहचली. पहिल्या दिवशी भारताला फक्त पाच पदकांवर समाधान मानावे लागले होते.  त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा पदके मिळाली होती. तिसऱ्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या दिवशी अनुक्रमे  8, 3, 8, 7 आणि 5 पदकं पटकावली होती. आठव्या दिवशी भारताने इतिहास रचत 15 पदके जिंकली. मागील दशकभरात आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत एका दिवसात भारताला कधीही 15 पदके मिळाली नव्हती. 

रविवारचा दिवस कसा राहिला ?

रविवारी आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. भारताने तीन सुवर्णपदकावर नाव कोरले. शूटिंगच्या ट्रॅप स्पर्धेत पुरुष संघाने सांघिक कामगिरीमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. अविनाश साबळेने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याशिवाय शॉटपुटमध्ये तजिंदरपाल सिंह तूरने सुवर्णपदक पटकावले.महिला शुटिंगमध्ये, महिला गोल्फ (वयक्तिक), पुरुष बॅडमिंटन, महिला 1500 मीटर अॅथलेटिक्स, लांब उडीमध्ये रौप्य पदक पटकावले. 

भारतीय खेळाडूंचा जलवा….

भारताच्या नेमबाजांनी ट्रॅप स्पर्धा गाजवली, महिला बॉक्सिंग, पुरुष 1500 मीटर रनिंग,  हेप्टाथेलॉन आणि डिस्कस थ्रोमध्ये कांस्य पदकावर कब्जा केला. विश्व चॅम्पियन निखत जरीन हिच्याकडूनही सुवर्णपदकाची अपेक्षा होती.पण सेमीफायनलमध्ये निखतचा पराभव झाला. तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.  भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचे अर्धशतक पूर्ण केलेय, एकूण मेडल्सची संख्या 53 इतकी झाली आहे. भारताने आतापर्यंत 13 सुवर्णपदकावर नाव कोरलेय. 21 रौप्य पदके पटकावली आहेत. त्याशिवाय 19 कांस्य पदकावर समाधान मानावे लागलेय. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे सुवर्णपदकाचे स्वप्न धुळीस मिळाले. यजमान चीनने भारताचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच रौप्य पदकावर समाधान मानलेय. 

गुणतालिकेची स्थिती काय ? कोणत्या देशाने किती पदके पटकावली ?

चीन-  (132 सुवर्णपदक), (72 रौप्य), (39 कांस्य) एकूण 243 मेडल

कोरिया- (30 सुवर्णपदक), (35 रौप्य) (60 कांस्य) – एकूण 125 मेडल

जापान- (29 सुवर्णपदक), (41 रौप्य), ( 42 कांस्य) – एकूण 112 मेडल

भारत- (13 सुवर्णपदक), (21 रौप्य), (19 कांस्य) – एकूण 53 मेडल

उज्बेकिस्तान- (11 सुवर्णपदक),  (12 रौप्य), (17 कांस्य) – एकूण 40 मेडल

थायलँड- (10 सुवर्णपदक), (6 रौप्य), (14 कांस्य)- एकूण 30 मेडल

चीनी ताइपै- (9 सुवर्णपदक),  (10 रौप्य),  (14 कांस्य)- एकूण 33 मेडल

हाँगकाँग- (6 सुवर्णपदक), (15 रौप्य),  (19 कांस्य)- एकूण 40 मेडल

उत्तर कोरिया- (5 सुवर्णपदक),  (9 रौप्य),  (5 कांस्य) – एकूण 19 मेडल

इंडोनेशिया- (4 सुवर्णपदक), (3 रौप्य), (11 कांस्य)- एकूण 18 मेडल

[ad_2]

Related posts