World Cup Live Streaming In Marathi To Hindi 9 Languages With 120 Commentators Latest Marathi Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup Commentators : क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधी 4 तारखेला ओपनिंग सेरेमनी असेल. यावेळी सर्व दहा संघाचे कर्णधार एकत्र येण्याची शक्यता आहे. पाच ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. विश्वचषकाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.  वर्ल्ड कप सामन्यासाठी अधिकृत ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कने खास तयारी केली आहे. विश्वचषकात समालोचन करणाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मराठी, हिंदीसह नऊ भाषांमध्ये समालोचन होणार आहे. त्यासाठी तब्बल 120 कॉमेंटटरची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गज माजी खेळाडूंचा समावेश आहे.  

कोणत्या भाषेत होणार वर्ल्ड कप सामन्याची कॉमेंट्री…

विश्वचषक सामन्यावेळी अनेक दिग्गज समालोचन करताना पाहायला मिळतील. सुनील गावसकर,रिकी पाँटिग, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन आणि वकार युनूस सारख्या दिग्गजांचा या यादीत समावेश आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह नऊ भाषांमध्ये क्रिकेट चाहते कॉमेंट्री ऐकू शकतील.  प्रत्येक भाषांसाठी वेगवेगळे दिग्गज आहेत.  मराठी. तामिळ, तेलुगू, कन्नड़, बंगाली, गुजराती आणि मल्याळम यासारख्या भाषांमध्ये समालोचन होणार आहे. 

मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन विश्वचषकात प्रेजेंटर

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन विश्वचषकात प्रेजेंटरच्या भूमिकेत दिसेल. ग्रेसशिवाय विश्वचषकात आठ प्रेजेंटर असतील. त्यासोबत इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॉफ डु प्लेसी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून समालोचनासाठी सहभागी असतील. लिसा स्थळेकर, रमीज राजा, रवी शास्त्री, ऍरॉन फिंच, सुनील गावसकर आणि मॅथ्यू हेडन यांचा समावेश असेल. तसेच, इयान स्मिथ, नासिर हुसेन आणि इयान बिशप हे आयसीसी कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसेल.

शॉन पोलॉक, अंजुम चोप्रा आणि मायकल एथर्टन कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसतील. सायमन डूल, म्पुमेलेलो मबांगवा, संजय मांजरेकर, केटी मार्टिन, दिनेश कार्तिक, डर्क नॅनेस, सॅम्युअल बद्री, अतहर अली खान आणि रसेल अर्नाल्डही कॉमेंट्री पॅनेलमध्ये असतील. समालोचक हर्षा भोगले, कास नायडू, नार्क निकोलस, नताली जर्मनोस, मार्क हॉवर्ड आणि इयान वॉर्ड यांसारखे दिग्गजही समालोचन करताना दिसतील.

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  – 

5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.

चेन्नईत भारताचा पहिला सामना – 

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे. 



[ad_2]

Related posts