[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
iPhone15 Heating Issue: Apple ची नव्यानं लाँच झालेली आयफोन 15 सीरिजची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात आहे. नवी आयफोन सीरिज बाजारात आली की, ती खरेदी करण्यासाठी बाजारात झुंबड उडते. सीरिजची घोषणा झाल्यापासूनच आयफोन आणि आयफोन बनवणारी कंपनी अॅपल चर्चेत असते. पण, सध्या आयफोनच्या नव्याकोऱ्या सीरिजची चर्चा रंगली आहे ती, हीटिंगच्या तक्रारींमुळे. iPhone 15 मध्ये हीटिंगच्या समस्या उद्भवत असून त्याबाबत अनेक युजर्सनी तक्रारीही केल्या आहेत. Apple iPhone 15 वापरल्यानंतर काही काळानं आयफोन ओव्हर हिट होत असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे. आता यावर कंपनीकडूनही भाष्य करण्यात आलं आहे.
अॅपलनं नुकताच लॉंच केलेल्या आयफोन 15 च्या आता यपजर्सकडून तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक युजर्सनी आयफोन 15 प्रो वापरत असताना ओव्हरहिटींगच्या समस्या येत असल्याची तक्रार केली आहे. कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. डिव्हाइस सेट अप केल्यानंतर किंवा पुन्हा रिस्टार्ट केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम होऊ शकतो, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर काही रिपोर्ट्सही आलेत, त्यामधून असा दावा करण्यात आला आहे की, Android टाइप सी चार्जिंग केबल वापरल्यामुळे आयफोन 15 मध्ये हीटिंग समस्या येत आहेत. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की हे थर्मल डिझाइनमुळे होत आहे. परंतु अॅपलने ही समस्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे सोडवली जाईल असं सांगितलं आहे.
Apple claimed the titanium case was an “innovation” meanwhile it’s causing the iPhone 15 to overheat.
Titanium has low thermal conductivity compared to aluminum & other metals making it hot to touch. Also the APU chip they engineered is a toaster.pic.twitter.com/ThP7iBYJgn
— Financelot (@FinanceLancelot) September 28, 2023
अॅपलकडून स्पष्टीकरण
अॅपलनं अलीकडेच लाँच केलेल्या iPhone 15 मॉडेल्समध्ये ओव्हरहाटिंगची समस्या उद्भवत असून त्याबाबत अनेक युजर्सनी तक्रार केली आहे. युजर्सकडून सातत्यानं केल्या जाणाऱ्या तक्रारींची दखल अॅपलनं घेतली असून ती मान्यही केली आहे. अनेक युजर्सनी प्रो मॉडेल वापरताना फोन गरम होत असल्याची तक्रार केली आहे. कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत असल्याचं सांगितलं आहे. तसेच, क्यूपर्टिनो, यूएस-आधारित कंपनीनं iOS 17 मधील बगमुळे हे झालं असल्याचं म्हटलं आहे. सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ही समस्या दूर होऊ शकते, तसेच इतर काही अॅप आहेत, त्यामुळेही ओव्हरहिटिंग होत असल्याचं अॅपलचं म्हणणं आहे.
ओव्हरहिटिंगचं कारण शोधताना आम्ही केलेल्या तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. ज्यामुळे आयफोन ओव्हरहिट होऊ शकतो असं निदर्शनास आलं. डिव्हाइस सेटअप केल्यानंतर किंवा पुन्हा रिस्टार्ट केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम होऊ शकतो, असं अॅपलचं म्हणणं आहे.
“आम्हाला iOS 17 मध्ये एक बग देखील सापडला आहे ज्यामुळे काही युजर्सच्या डिव्हाइसमध्ये ओव्हरहिटिंगची समस्या निर्माण होत आहे. सॉफ्टवेअर अपडेटमध्ये याचा मार्ग सापडेल आणि ही समस्या दूर होईल. तर, काही डिव्हाइसमध्ये थर्ड पार्टी अॅप्सच्या काही बाबींमुळे आयफोन ओव्हरहिट आहेत. ज्यामुळे ते सिस्टम ओव्हरलोड करत आहेत. आम्ही या अॅप डेव्हलपर्ससोबत इश्यू रोलआऊट करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्याचं काम करत आहोत.”, असं अॅपलकडून सांगण्यात आलं आहे.
अॅपलनं फेटाळले इतर दावे
आयफोन 15 मध्ये जास्त गरम होण्याच्या समस्या वाढत आहेत. टायटॅनियम बॉडीमुळे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हीटिंग समस्या उद्भवू शकते, असं बोललं जात आहे. मात्र, अॅपलनं या चर्चांना फेटाळून लावलं आहे. याशिवाय अॅपलनं सी-टाईप चार्जिंग पोर्टमुळे ओव्हरहिट होत असल्याच्या शक्यताही फेटाळून लावल्या आहेत. फोर्ब्सच्या अहवालात असं म्हटलं आहे की, इंस्टाग्रामनं 27 सप्टेंबर रोजी हीटिंग समस्येचं निराकरण करण्यासाठी एक अपडेट आणलं होतं. तर Apple इतर विकासकांसोबत हीटिंग समस्येचं निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
[ad_2]