Check World Cup Jerseys Of All 10 Teams Icc World Cup 2023 Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup Jerseys Of All Teams : क्रिकेटच्या महाकुंभाला अवघ्या तीन दिवसाचा कालावधी शिल्लक आहेत. यंदाची स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने पार पडणार असून दहा संघ सहभागी होणार आहेत. 48 सामन्यानंतर क्रिकेटचा विश्वविजेता मिळेल.  5 ऑक्टोबरपासून क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी ओपनिंग सरेमनी होणार आहे. सध्या प्रत्येक संघ सराव सामने खेळण्यात व्यस्त आहे. विश्वचषकात सहभागी झालेल्या सर्व संघांनी जर्सी लाँच केली आहे. भारत, पाकिस्तानसह सर्वच संघाच्या जर्सी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. प्रत्येक संघाच्या जर्सीचे वेगळे महत्व आहे. पाकिस्तानसह प्रत्येक संघाच्या जर्सीवर भारताचे नाव आहे. कारण, विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. भारत आणि पाकिस्तानच्या जर्सीवर स्टार आहेत. भारताने दोन विश्वचषक जिंकले आहेत, त्यामुळे दोन स्टार आहेत. तर पाकिस्तानच्या जर्सीवर फक्त एक स्टार आहे. 1992 मध्ये पाकिस्तान संघाने विश्वचषक उंचावला होता. 

जर्सी सोशल मीडियावर व्हायरल – 

विश्वचषकाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पाकिस्तानसह सर्वच संघाची जर्सी चर्चेचा विषय आहे. सोशल मीडियावर जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. 

चेन्नईत भारत-ऑस्ट्रेलियाचा आमना सामना – 

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे. 

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  – 

5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.
 



[ad_2]

Related posts