OnePlus 11 5G Marble 0dyssey Edition Smartphone Launch In India On 6th June 2023 Check The Features And Priece Tech News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OnePlus 11 5G Marble Odyssey Edition : सध्या मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जबरदस्त फिचर्ससोबत फोन लाँच करत आहेत. यामुळे ग्राहकांना अनेक ऑप्शन उपलब्ध होतात आणि साहजिकच ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळते. मात्र कोणत्या फिचरचा फोन विकत घ्यायला पाहिजे, याबाबत गोंधळ उडतो. पण तुमचा गोंधळ दूर व्हावा यासाठी तुम्हाला OnePlus 11 5G च्या  नवीन व्हर्जनच्या स्मार्टफोनची लाँचिंगच्या आधीच अपडेट देत आहोत. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात वनप्लस कंपनीने Oneplus 11 5G फोन लाँच केला होता. आता कंपनीने याच सिरीजचे नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. हा फोन नवीन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. पुढील महिन्यात भारतामध्ये OnePlus 11 5G Marble Odyssey Edition चा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया OnePlus  5G  च्या फिचर आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया…

OnePlus 11 5G Marble Odyssey Edition Launch : वनप्लसच्या नवीन व्हेरियंटच्या स्मार्टफोनमध्ये कंपनी भन्नाट फिचर्ससह लाँच होणार 

फिचर्सबद्दल जाणून घ्या 

1. प्रोसेसर : स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 चिपसेट सपोर्ट 
2. मागील कॅमेरा : ट्रिपल कॅमेरा सेटअप, 50MP चा Sony IMX890 आणि  48MP Sony IMX581 अल्ट्रावाइड कॅमेरा  आणि 32MP पोट्रेट कॅमेरा
3. सेल्फी कॅमेरा : 16MP फ्रंट कॅमेरा
4. बॅटरी : 5000mAh इतकी क्षमता
5. चार्जिंग सपोर्ट : 100 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट 

या स्मार्टफोनमध्ये तु्म्हाला 12 जीबी रॅम आणि 256 जीबी  इंटरनल स्टोरेजच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध करू देणार आहे. या कंपनीचा रेग्युलर मॉडल ग्रीन आणि ब्लॅक रंगाच्या व्हेरियंट उपलब्ध असून ज्याची किंमत 56,999 रूपयांपासून सुरु होते. याच व्हेरियंटच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये फोन उपलब्ध होणार आहे.

या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल जाणून घ्या

वनप्लस 11 5G Marble Odyssey व्हर्जनचा स्मार्टफोनची किंमत 56,999 रूपयांपासून सुरूवात होते.  एका सोशल मीडिया युजर्सनुसार, वनप्लसच्या नवीन व्हर्जनची किमत रेग्युलर मॉडेलपेक्षा 3000 रूपयांना जास्त आहे. हा नवीन स्मार्टफोन जवळपास 64,000 रूपये इतक्या किमतीसोबत लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन पुढील महिन्यात 6 जून रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

टेक्नो कंपनीने  केले 3 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच

अलीकडेच टेक्नो कंपनीने  भारतामध्ये   3 स्मार्टफोन लाँच केली आहेत. या मोबाईल कंपनीने Tecno Camon 20 सिरीजचे स्मार्टफोन लाँच केली आहेत. यामध्ये Tecno Camon 20, 20 Pro 5G आणि Camon 20 5G Premier  स्मार्टफोनचा समावेश आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅम  आणि 128GB इंटरनल स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसोबत लाँच केला आहे. या व्हेरियंटची किमत 19,999 इतकी आहे. याच सिरीजमधील टॉप व्हेरियंटची किमत 21,999 रूपये इतकी आहे.

इतर बातम्या वाचा : 

OnePlus Nord CE 3 Lite Updates: खिशाला परवडणारा बजेट फोन; One Plus Nord CE3 चा आज सेल, जाणून घ्या खास फिचर्स



[ad_2]

Related posts