Venus will transit in the zodiac sign of Mercury the fortunes of these zodiac signs will shine

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shukra Gochar In Kanya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे 1 महिना लागतो. 

नुकतंच शुक्र ग्रहाने गोचर केलं असून नोव्हेंबरच्या सुरुवातीला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान शुक्र ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेशाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांना शुक्राचा आशीर्वाद मिळणार आहे. जाणून घेऊया शुक्राचं गोचर कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

कन्या रास (Kanya Zodiac)

शुक्राचं गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतं. यावेळी तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. पैसा आणि आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होणार आहे. तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. नशीब तुमच्या पाठीशी असेल. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळतील. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

शुक्राचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. तुम्हाला परदेशातून आर्थिक लाभही मिळू शकतो. या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. शेअर बाजाराशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळू शकते. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. म्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

शुक्राचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकतं. तुमच्या व्यावसायिक जीवनात होणारे बदल तुमच्या बाजूने असतील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुमचे तुमच्या आईसोबतचे नातं मजबूत राहणार आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. कोर्टात सुरू असलेली प्रकरणे तुमच्या बाजूने सुटू शकतात. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts