[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Priyanka Gandhi Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातून (Maharashtra Politics) लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही माहिती प्रियंका यांचे राजकीय सल्लागार आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांनी दिली आहे.
“प्रियंका गांधी या देशभरात सर्वाधिक लोकप्रिय नेत्या आहे. त्यात, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्या महाराष्ट्रातूनही लोकसभा लढू शकतात, असे आचार्य कृष्णम म्हणाले आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. आचार्य कृष्णमयांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच भाजपकडून लोकसभा निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या चेहऱ्यांना समोर केले जाणार असल्याची चर्चा आहे. असे असतानाच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी देखील महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधींच्या राज्यातील एंट्रीमुळे राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षात प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत सतत सरकार विरोधात आवाज उठवला आहे. त्याचप्रमाणे त्यांची महाराष्ट्रात देखील एन्ट्री झाल्यास राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तेलंगणा की, महाराष्ट्र; प्रियांका गांधी कुठून निवडणूक लढवणार?
लोकसभेच्या 2024 निवडणूकांसाठी काँग्रेस चांगलीच तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. असं म्हटलं जात आहे की, आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आधी प्रियांका गांधी त्यांची आजी आणि देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पावलावर पाऊल ठेवत तेलंगणातून (Telangana) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होत्या. पण, आता त्या महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
[ad_2]