[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pune Crime News : पुणेकरांची शक्कल आणि शौक याची चांगलीच चर्चा होते. त्यात आता पुण्यातील गुन्हेगारांची शक्कल आणि त्यांच्या शौकचीदेखील चर्चा रंगताना दिसत आहे. एखादी गाडी आवडली की उचलायची, अशी मोहिम पुण्यातील काही भुरट्या चोरांनी सुरु केली. पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून यामाहा कंपनीच्या आणि त्याही फक्त आर एक्स हंड्रेड मॉडेलच्या गाड्या चोरीला जात होत्या. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या गाड्यांना आज देखील मोठी मागणी असून हौशी लोक लाखों रुपयांना या गाड्या खरेदी करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील दोन तरुणांनी शहरातून या गाड्या चोरण्याचा सपाटा लावला होत.
पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागातील CCTV कॅमऱ्यामधील फुटेज तपासून या आरोपींपर्यंत पोहचण्यात यश मिळवलं. या आरोपींनी अशा 20 यामाहा आर एक्स हंड्रेड गाड्या चोरल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी 16 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षभरात अनेक गाड्या चोरीला जात होत्या. त्यात सगळ्या नागरिकांच्या तक्रारी यामाहा कंपनीच्या गाड्या चोरी गेल्याच्या होत्या. त्यानंतर या सगळ्याच गाड्या शोधण्यासाठी पथक नेमण्यात आलं होतं. या पथकाने गाड्यांची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी शहराती तब्बल 440 CCTV तपासले आणि या गाड्या जप्त केल्या.
आरोपी आदित्य मानकर (वय 19, रा. उरुळी कांचन, पुणे), मयूर पवार (वय 20, उरुळी कांचन, पुणे) आणि अन्य एक जण अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावं आहेत. उरळीकांचन परिसरात रात्रीच्या वेळी मोटर सायकल चोरी करून जात असल्याचे पोलिसांना त्यांच्या बातमीदाराच्या मदतीने माहिती मिळाली होती. त्यानुसार सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू होता. त्यानंतर अखेर त्यांनी गाड्या आणि तीन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
440 सीसीटीव्ही तपासले..
पुणे शहरातील विविध भागातून या चोरट्यांनी चोरलेल्या तब्बल 16 आर एक्स 100 या यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. यासाठी पोलिसांनी पुणे शहरातील तब्बल 440 CCTV तपासले आहेत. एका एका CCTV फुटेज पाहून पोलिसांनी त्या परिसरातून या गाड्या जप्त केल्या आहेत. तब्बल 4 लाख 50 हजार एवढी या गाड्यांची किंमत आहे.
[ad_2]