[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asian Games 2023, IND vs PAK : विश्वचषकासाठी सर्वजण आतुर झाले आहेत. अवघ्या काही तासांत विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्येही लढत होणार आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सामना होणार आहे. पण त्याआधी क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान भिडण्याची शक्यता आहे. होय… आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट प्रकारात भारत आणि पाकिस्तानचा सामना होऊ शकतो. चीनमधील हांगझू येथे भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा पराभव केला होता. तर पाकिस्तान ने हाँगकाँगला पराभूत केले होते. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानसोबत आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ बांगलादेश आणि अफगाणिस्तानपेक्षा बलाढ्य आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर 14 ऑक्टोबर आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर सामना होईल.
सेमीफायनल कधी ?
6 ऑक्टोबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सकाळी साडेसहा वाजता सामना होईल. तर पाकिस्तानचा सामना त्याच दिवशी दुपारी 11.30 वाजता होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा अंतिम सामना सात ऑक्टोबर रोजी 11.30 वाजता होणार आहे.
विश्वचषक 2023 मुळे भारत आणि पाकिस्तानसह सर्वच संघांनी आपल्या ब संघाला मैदानात उतरवले आहे. इतर संघाच्या तुलनेत भारतीय खेळाडूंकडे दांडगा अनुभव आहे. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
भारताचा संघ –
टीम इंडिया : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जायसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंह.
पाकिस्तान टीम : कासिम अकरम (कर्णधार), ओमैर बिन यूसुफ, आमिर जमाल, अराफात मिन्हास, अरशद इकबाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्जा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (विकेटकीपर), रोहेल नजीर, शाहनवाज दहानी, सुफियान मुकीम आणि उस्मान कादी.
[ad_2]