[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अहमदाबाद : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला काल (5 ऑक्टोबर) अहमदाबादामध्ये मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. सलामीच्या लढतीत विश्वविजेत्या इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत न्युझीलंडने विजय सलामी दिली. या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला तो तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रवींद्रच्या शतकी खेळीचा. त्याच्या खेळीने अवघ्या न्यूझीलंडचे नव्हे तर अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले गेले अशी त्याची खेळी राहिली. 82 चेंडूंमध्ये शतक ठोकत न्युझीलंडचा आपण उगवता तारा असल्याचं सिद्ध करून दाखवलं.

रचिनचच्या या खेळीमुळे न्यूझीलंडसाठी निश्चित तो भविष्यामध्ये एक आधारस्तंभ म्हणून उभा राहील यामध्ये काही शंका नाही. डेव्हिड कॉन्वेसोबत 35.1 षटकात 273 धावा करत रचिनने विजय मिळवून दिला. दोघांनी केलेली भागीदारी ही वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठी चौथी भागीदारी ठरली. त्यामुळे विश्वचषकात पदार्पणात शतक ठोकणाऱ्या या दोघांसाठी कालची रात्र संस्मरणीय ठरली.

मॅच जिंकल्यानंतर रचिन म्हणतो..

मात्र, सर्वात मोठा आनंद होता तो रचिनसाठी. कारण तो भारतीय वंशाच्या आई-वडिलांचा मुलगा आहे. जो वेलिंग्टनमध्ये मोठा झाला. त्याने मॅच जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, शतक हे नेहमीच खास असते. त्याने पुढे सांगितले की भारतात परफॉर्म करून सक्षम होण्याच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचं आहे. माझ्या पालकांना तिथे पाहून खूप छान वाटलं. त्यांनी न्यूझीलंडहून उड्डाण केलं होतं. तो क्षण मिळणे खूप छान होतं. आम्ही जेव्हाही बंगलोरमध्ये असतो तेव्हा माझ्या आजी-आजोबांना भेटला वेळ मिळावा म्हणून प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने बॅटिंग तर केलीच, मात्र रचिनला 17 व्या षटकात गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलं होतं. आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय समाधानकारक केली.

अचानकपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रचिनच्या बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल करण्यात आला होता. त्याला अचानकपणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रचिननं कुठल्याही प्रकारे दडपण न घेता खेळी केली आणि त्यामुळेच त्याच्या खेळीचं कौतुक होत आहे. न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्याला फलंदाजीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यास सांगितल्यानंतर यापेक्षा मोठं काहीच नसल्याचं प्रांजळपणे कबूल करताना सांगितले.

न्यूझीलंडसाठी मास्टरस्ट्रोक असू शकतो

रचिनच्या खेळीचे फक्त न्यूझीलंडकडून कौतुक झालं नाही. तर समालोचक रवी शास्त्री यांनीही त्याच्या खेळीचे कौतुक केलं. रवी शास्त्री म्हणाले की, भारताने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्याप्रमाणे रचिन रविंद्रला टॉप ऑर्डरला पाठवणे हा न्यूझीलंडसाठी मास्टरस्ट्रोक असू शकतो. या वक्तव्यावरूनच रचिनच्या खेळीचे महत्त्व लक्षात येतं.

भारतासाठी डोकेदुखी होणार?

दुसरीकडे, भारताचा परफॉर्म न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकपमध्ये नेहमीच कमकुवत राहिला आहे. टक्केवारीत बोलायचं झाल्यास भारत न्यूझीलंडमध्ये अवघ्या 37.50 टक्क्यांनी यशस्वी झाला आहे. न्यूझीलंडविरोधात वर्ल्डकपमध्ये पाच सामने गमावले आहेत. अशा स्थितीत भारतीय कंडिशनमध्ये दमदार बॅटिंग करणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडला गवसला असल्याने निश्चितच भारतासाठी 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लढतीसाठी डोकेदुखी ठरवू शकतो, यात काही शंका नाही. हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यात रचिनने सलामीवीर म्हणून 72 चेंडूत 97 धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंजदाजी करण्यासाठी सुवर्णसंधी रचिनला मिळाली. केन विल्यम्सन आजारी असल्याचेही त्याच्या पथ्यावर पडले.

इतर महत्वाच्या बातम्या

Rachin Ravindra : विश्वविजेत्या साहेबांना अहमदाबादच्या मैदानात नाचवणारा न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रविंद्र आहे तरी कोण?

[ad_2]