Mumbai Goregaon Fire PM Modi Also Announced Help To The Relatives Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: गोरेगावमधील इमारतीच्या (Mumbai Goregaon Fire News)  पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून 58 जण जखमी झाले आहेत. जय भवानी इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीनच्या आसपास भीषण आग लागली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरेगावमधील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक केला आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन  लाख  तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदींकडून मुंबईतील आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी या संदर्भात ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले,  गोरेगाव दुर्घटनेतील जीवितहानीमुळे व्यथित झालो आहे. मुंबईतल्या गोरेगाव इथल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे.  जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी  प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती  मदत प्रशासन करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह  मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50  हजार  रुपये दिले जातील.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,   ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आगीच्या या घटनेची  मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबईचे शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.  या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात यावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी जळून खाक

जखमींवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. दरम्यान आग लागलेल्या इमारतीमधील सर्व रहिवाशांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या आहेत. 

हे ही वाचा:

Goregaon Fire: गोरेगावात आठ जणांचा मृत्यू आगीमुळे होरपळून नाही, मुंबई मनपा आयुक्तांचा दावा



[ad_2]

Related posts