IPL 16 Mother Volleyball Player Father Athlete Born In Chennai Who Is Sai Sudharsan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sai Sudharsan : आयपीएल 2023 च्या थरारक फायनलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारुन पाचव्यांदा चषकावर नाव कोरलं. CSK ने हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. रवींद्र जाडेजाच्या वादळी खेळीमुळे चेन्नईने गुजरातच्या जबड्यातून सामना खेचून आणला. चेन्नईने 5 विकेटच्या मोबदल्यात गुजरातचं लक्ष्य भेदलं. दोन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे फायनलची रंगत आणखी वाढली होती. गतविजेत्या गुजरात टायटन्सने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. गुजरातने 20 षटकात 214 धावा केल्या. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिलवर सर्वांच्या नजरा खिळल्या असताना, साई सुदर्शन या युवा फलंदाजाने जी काही फटकेबाजी केली,  त्याने चेन्नईसमोर भलंमोठं लक्ष्य उभं राहिलं. 

एकीकडे चेन्नईने शुभमन गिलची तयारी केली असताना, साई सुदर्शन नावाचा पेपर आला, अशी स्थिती पाहायला मिळाली. साई सुदर्शनने अवघ्या 47 चेंडूत 96 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 6 षटकार लगावले. अंतिम सामन्याचा दबाव असूनही साई सुदर्शनने केलेली फटकेबाजी लाजवाब होती. अवघ्या 22 वर्षीय साई सुदर्शनने आपल्या खेळीने केवळ भारतीय क्रिकेटचंच नव्हे तर जागतिक क्रिकेटचं लक्ष वेधलं आहे.

कोण आहे साई सुदर्शन? (Sai Sudharsan) 

  • साई सुदर्शनचा जन्म 15 ऑक्टोबर 2001 रोजी तामिळनाडूतील चेन्नई इथं झाला. सुदर्शनचे आई-वडीलही क्रीडा जगताशी संबंधित आहेत.  
  • आई उषा भारद्वाज यांनी राज्यस्तरावरील वॉलिबॉल स्पर्धा गाजवली होती. तर वडील आर भारद्वाज हे राष्ट्रीय पातळीवर अॅथलिट होते. 
  • हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने मागील वर्षी त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र तेव्हा त्याला चमक दाखवता आली नाही.
  • गेल्या वर्षी 5 सामन्यात त्याने एका अर्धशतकासह 145 धावा केल्या होत्या.
  • साईची क्षमता ओळखून गुजरातने त्याला यावर्षीही आपल्या संघात स्थान दिलं. 
  • यंदा ज्या ज्या सामन्यात संधी मिळाली, त्या त्या वेळी साई सुदर्शनने सोनं केलं.
  • यंदाच्या आयपीएलमध्ये 8 सामन्यात त्याने 51.71 च्या सरासरीने 362 धावा केल्या. यंदाचा त्याचा स्ट्राईक रेट 141.41 इतका होता.  

तामिळनाडू प्रीमयर लीगमध्ये सर्वात महागडा खेळाडू

साई सुदर्शन हा सध्या आयपीएलमध्ये गाजत असला तरी त्याने यापूर्वीच तामिळनाडू प्रीमयर लीग ही स्पर्धा गाजवली आहे. तामिळनाडू लीगमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यावेळी त्याला 21.60 लाखांची बोली लागली होती. दुसरीकडे गुजरातने त्याला केवळ बेस प्राईस म्हणजेच 20 लाखात खरेदी केलं होतं. 

साई सुदर्शन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूचं प्रतिनिधीत्व करतो. 

गुजरातच्या आघाडीच्या खेळाडूंची फटकेबाजी 

आयपीएलच्या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सर्वात आधी फलंदाजी करताना गुजरात संघाने 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी 47 चेंडूत 96 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 204.25 होता. सुदर्शनशिवाय रिद्धिमान साहाने 54 आणि शुभमन गिलने 39 धावा केल्या.

हेही वाचा

चेन्नईच्या विजयात ‘या’ तीन मराठमोळ्या खेळाडूंचा सिंहाचा वाटा; CSK साठी केलीये लाखमोलाची कामगिरी

 

[ad_2]

Related posts