Highest Totals In World Cup South Africa Break Australia Record In World Cup 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Highest Totals in World Cup : विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं शनिवारी  श्रीलंकेचा (South Africa vs Sri Lanka Match Highlights ) 102 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रचली. दक्षिण आफ्रिकेनं  श्रीलंकेची गोलंदाजी फोडून काढताना 428 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवी क्विंटन डिकॉक,  वॅन डेर दुसेन आणि मारक्रम  यांनी केलेल्या शेतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात पाच बाद 428 धावांचा डोंगर उभा केला. 

428 धावांचा डोंगर उभारत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. याआधी विश्वचषकात सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने2015 मध्ये 417 धावांचा डोंगर उभारला होता. आफ्रिकेनं या विक्रमाला सुरुंग लावला. विश्वचषकात पाचव्यांदा 400 पेक्षा जास्त धावा निघाल्या आहेत. 2023 विश्वचषकाआधी कधी कधी 400 पेक्षा जास्त धावा निघाल्या पाहूयात.. 

1. ऑस्ट्रेलिया (Australia) – 

विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ असलेला ऑस्ट्रेलिया या यादीत पहिल्या स्थानावर आहे. पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने पर्थच्या मैदानावर 417 धावांचा डोंगर उभारला होता. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरोधात 50 षटकात 417 धावा चोपल्या होत्या. डेविड वॉर्नरने 19 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 178 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये केलेल्या 417 धावा विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा आहेत.  

2. भारत (India) – 

दोन वेळचा विश्वविजेता टीम इंडिया या यादीत आहे. 2007 च्या विश्वचषकात भारताची सुरुवात अतिशय खराब झाली होती. साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. पण बरमूडाविरोधातील सामन्यात टीम इंडियाने विक्रम केला. भारताने बरमूडाची गोलंदाजी फोडून काढली होती. भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 413 धावा फलकावर लावल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सहवागने 87 चेंडूवर 114 धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय सौरव गांगुली (89), युवराज सिंह (83), आणि सचिन तेंडुलकर (57) यांनी वादळी अर्धशतके ठोकली होती.

3. दक्षिण अफ्रिका (South Africa) –  

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघामध्ये दक्षिण अफ्रिका (South Africa)  संघाचाही समावेश आहे. 2015 च्या विश्वचषकात आयर्लंड विरोधातही आफ्रिकीच्या फलंदाजांनी वादळी खेळी केली होती. दक्षिण अफ्रिका (South Africa) संघातील फलंदाज आयर्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडले होते. आफ्रिकन संघाने निर्धारित 50 षटकात 411 धावा ठोकल्या होत्या.  कॅनबराच्या मैदानावर हाशिम अमला (159) आणि फाफ डु प्लेसिस (109) यांनी शतकी खेळी केली होती. 

4. दक्षिण अफ्रिका (South Africa) –  

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत भलेही विश्वचषक जिंकला नसेल, पण या संघाला कमकुवतही म्हटले जात नाही. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. वेस्ट इंडिजविरोधात दक्षिण आफ्रिका संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात 408 धावा उभारल्या होत्या. कर्णधार एबी डी व्हिलियर्सने अवघ्या 66 चेंडूमध्ये नाबाद 162 धावा चोपल्या होत्या. 

5. श्रीलंका (Sri Lanka)- 

1996 च्या विश्वचषकात श्रीलंका संघाने केनियाविरोधात धावांचा डोंगर उभारला होता. श्रीलंकेच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला होता. 50 षटकात श्रीलंका संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात 398 धावा चोपल्या होत्या.  श्रीलंकासाठी अरविंदा डी सिल्वा (145), अर्जुन रणतुंगा (75), असंका गुरुसिन्हा (84) यांनी वादळी फलंदाजी केली होती. 

[ad_2]

Related posts