Mini Bus Accident At Varandha Ghat On Bhor Mahad Route Four Passengers Injured

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : भोर-महाड मार्गावरील (varandha ghat) वरंधा घाटात मिनी बसचा मोठा (Bus Accident)अपघात झाला आहे. वारवंड ते शिरगावदरम्यान (bhor) पुणे स्वारगेटहून भोरमार्गे महाड-चिपळूणकडे जाणाऱ्या 17 सिटर मिनी बसचा  अपघात झाला आहे. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि चार प्रवासी जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या  माहितीनुसार, काल रात्री म्हणजेच शनिवारी दोन वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने बस थेट दरीत कोसळली. ही दरी किमान 50 ते 60 खोल होती. कोसळल्यानंतर धरणाच्या पाण्यापासून पाच फुट अलीकडे गाडी अकडून पडली आणि त्याचमुळे मोठीदुर्घटना टळली. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते.  

एकाचा मृत्यू तर चार जखमी….

गाडी कोसळल्यानंतर अडकून पडल्याने चार प्रवासी धैर्याने दरीतून बाहेर आले.त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनचालकाने अपघात स्थळापासून जवळच असलेल्या सह्याद्री हॉटेल मालकाला या अपघाताची माहिती दिली. गाडीत चालकासह दहा ते अकरा प्रवासी होते. त्यातील तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना भोर‌ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाने बाकी सर्व प्रवासी सुखरुप आहे. 

हॉटेल मालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

अपघात झाल्याची माहिती मिळताच हॉटेल मालकाने प्रसंगावधान दाखवून शिरगावच्या तरुणांना बोलवून घेतलं. त्यानंतर या सगळ्यांनी जखमी प्रवासींना बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यांनी दोराच्या साहय्याने अधांतरी अडकलेली बसला दोर बांधला आणि त्यानंतर सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं. हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार या सगळ्यांच्या प्रसंगावधानामुळे सगळे प्रवासी सुखरुप आहेत. 

वरंधा घाट रात्री धोक्याचा?

पुणे जिल्ह्यातील वरंधा घाट हा धोकाच्या आहे. रात्रीच्या वेळी या घाटात अनेकदा अपघात झाले आहे. खोली आणि रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शिवाय या घाटात धुकंही मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं. त्यामुळे चालकांना गाडी चालवण्यासाठी हे धुकं धोकादायक  ठरत आणि परिणामी अपघात होते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात किमान दोन महिने हा घाचट प्रवासासाठई बंद ठेवण्यात येतो. बंद ठेवल्यामुळे अनेक अपघात टळतात मात्र रात्रीच्यावेळी या घाटात प्रवास करणं जोखमीचं आहे. त्यामुळे खबरदारी घेत प्रवास करा नाही तर प्रवास टाळा, असं आवाहनदेखील अनेकदा करण्यात आलं आहे. 

[ad_2]

Related posts