South Australia Jake Fraser Mcgurk Break Fastest Century Ab De Villiers Record Jake Fraser 29 Balls Century List A

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jake Fraser Mcgurk 29 Balls Century : ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षाच्या फलंदाजाने एबी डिव्हिलिअर्सचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे कप स्पर्धेत  केरन रॉल्टन ओव्हल मैदानात एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडीत निघाला आहे. रविवारी दक्षिण ऑस्ट्रेलिया विरुद्ध टास्मानिया संघामध्ये लढत झाली. या सामन्यात 21 वर्षांच्या फलंदाज जेक फ्रेजर मॅकगर्क याने एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडला आहे. त्याने अवघ्या 29 चेंडूत शतक ठोकले. एबी डिव्हिलिअर्स याने 2015 मध्ये 31 चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम आज मोडीत निघाला आहे, पण हा सामना आंतरराष्ट्रीय नव्हता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम मोडीत निघाला आहे. 

21 वर्षीय जेक फ्रेजर मॅकगर्क याने अवघ्या 38 चेंडूत वादळी 125 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 13 षटकार आणि 10 चौकार लगावले. 50 षटकांच्या सामन्यात 12 व्या षटकात जेक फ्रेजर मॅकगर्क स्वत: तंबूत परतला. जेक फ्रेजर मॅकगर्क याने 29 चेंडूत शतक ठोकले. त्यानंतरही 125 धावा झाल्यानंतर तो तंबूत परतला. 21 वर्षाच्या ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेजर मॅकगर्क याने फक्त 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढील 11 चेंडूत 50 धावा चोपल्या.  जेक फ्रेजर मॅकगर्क याने एकाच षटकात 32 धावा कुटल्या.  

या सामन्यात टास्मानिया संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 435 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून 21 वर्षीय जेक फ्रेजर-मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) सलामीला उतरला होता. त्याने यावेळी अवघ्या 29 चेंडूत वेगवान शतक (29 Balls Fastest Century) झळकावले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलिअर्सच्या नावावरच राहणार रेकॉर्ड – 

21 वर्षीय जेक फ्रेजर मॅकगर्क याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 29 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. हा रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्राह्य धरला जात नाही. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम जेक फ्रेजर मॅकगर्क याच्या नावावर राहणार आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर आहे. 

एबीचे 31 चेंडूत शतक – 

दक्षिण आफ्रिकेच्या 360 डिग्री एबी डिव्हिलिअर्स याने आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या 31 चेंडूत शतक ठोकले होते. आजही हा रेकॉर्ड एबीच्या नावावरच आहे. त्याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या कोरी अँडरसन याच्या नावावरच होता. कोरी अँडरसन याने 36 चेंडूत शतक ठोकले होते. पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीने 37 चेंडूत शतक ठोकले आहे. 



[ad_2]

Related posts