[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
World Cup 2023, IND vs AUS KL Rahul : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजयी श्रीगणेशा केला. भारताच्या विजयात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सिंहाचा वाटा उचलला. दोघांच्या 165 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. कटीण परिस्थितीत विराट कोहली आणि राहुल यांनी झुंझार खेळी केली. राहुल याने षटकार मारत भारताचा विजय मिळवून दिला. पण या षटकारानंतर राहुल निराश झाल्याचा दिसला. राहुलला चौकार मारायचा होता, पण गेला षटकार… त्यामुळे राहुलही थोडावेळ निराश झाला होता. पण सामना जिंकल्याचे समाधानही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. केएल राहुल याने 97 धावांची दमदार खेळी केली.
विराट कोहलीने 85 तर केएल राहुलने नाबाद 97 धावाची खेळी केली. भारताची अवस्था एकवेळ तीन बाद दोन धावा, अशी दैयनीय होती. अशा कठीण परिस्थितीमधून राहुल-विराट जोडीने भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीकडे शतक ठोकण्याची संधी होती, पण जिंकण्यासाठी 33 धावांची गरज असतानाच विराट तंबूत परतला. राहुलकडेही शतक ठोकण्याची संधी होती. पण त्याला नशीबाने साथ दिली नाही. केएल राहुल 91 धावांवर फलंदाजी करत होता. राहुलला शतकासाठी 9 धावांची गरज होती. भारताला जिंकण्यासाठी पाच धावांची गरज होती. राहुलने आधी चौकार आणि मग षटकार मारण्याचा विचार केला. पण चौकार मारण्यासाठी गेलेला राहुल षटकार मारुन बसला. त्यानंतर थोड्यावेळासाठी त्याच्या चेहऱ्यावर निराशा झळकली. पण त्यानंतर सामना जिंकल्याचा आनंद राहुलने साजरा केला. राहुलच्या या रिअॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
हार्दिकमुळे राहुलचे शतक हुकले ? –
केएल राहुल 97 धावांवर राहिला. राहुलचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. काही चाहत्यांच्या मते, हार्दिक पांड्याच्या षटकारामुळे राहुलचे शतक हुकले. भारताचा विजय दृष्टीक्षेपात होता. भारत सहज सामना जिंकेल असे वाटत होते. त्या स्थितीमध्ये हार्दिक पांड्याने षटकार मारत धावांचे अंतर कमी केले. पण राहुलच्या शतकाचे गणित मात्र हुकले. विराट कोहली भारताच्या 167 धावा झाल्या तेव्हा बाद झाला. त्यानंतर राहुलने आक्रमक रुप धारण केले. पण त्याचवेळी हार्दिक पांड्यानेही षटकार मारला. हार्दिक पांड्याने षटकार न मारता स्ट्राईक राहुलला दिली असती तर कदाचीत शतक होऊ शकले असते.
याआधीही हार्दिक पांड्यावर असा आरोप झाला होता. युवा तिलक वर्माचे अर्धशतक हार्दिकमुळे झाले नव्हते. तिलक वर्माला 49 धावांवर नाबाद राहावे लागले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर हार्दिक पांड्या ट्रोल झाला. हार्दिकमुळेच राहुलचे शतक हुकले, असा आरोप चाहत्यांनी केला आहे.
[ad_2]