Babar Azam Record Against India In Odi Cricket IND Vs PAK World Cup Marathi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs PAK, Babar Azam Record : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना शनिवारी होणार आहे. शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. या सामन्यामध्ये बाबर आझम याच्या कामगिरीकडे (Babar Azam Record) सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. विश्वचषकातील (World Cup 2023) पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम (Babar Azam) याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. आता भारताविरोधात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा पाकिस्तानच्या चाहत्यांना असेल. पण बाबर आझम याला भारताविरोधात आतापर्यंत मोठी खेळी करता आली नाही.  जगातील अव्वल क्रमांकाच फलंदाज असलेल्या बाबरची (Babar Azam) भारताविरोधात निराशाजनक कामगिरी आहे. भारताविरोधात वनडेमध्ये मागील सहा वर्षांपासून बाबरला अर्धशतकही झळकावता आले नाही. 

पाकिस्तानच्या फलंदाजीचा स्तंभ मानला जाणाऱ्या बाबर आझम (Babar Azam) याला भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात दिमाखदार कामगिरी करता आली नाही. वनडेमध्ये भारताविरोधात त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आले नाही. 2017 मध्ये बाबरने भारताविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आजतागत त्याला एकाही अर्धशतक ठोकता आले नाही. धावांचा हा दुष्काळ विश्वचषकात दूर करणार का ? असा सवाल पाकिस्तानच्या चाहत्यांना सतावतोय. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विश्वचषकात एकदिवसीय सामना होत आहे. गेल्यावेळीस हे दोन संघ 2019 च्या विश्वचषकात आमनेसामने आले होते. त्या सामन्यात बाबर आझम याने 48 धावांची खेळी केली होती. ही त्याची भारताविरोधातील सर्वोत्तम खेळी आहे. 

भारताविरोधात बाबर प्रभावहीन, साधे अर्धशतकही नाही –

बाबर आझम याने पाकिस्तानसाठी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 107 वनडे डावात बाबरने 57 च्या सरासरीने 5424 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझम याने आतापर्यंत 19 शतके आणि 28 अर्धशतके ठोकली आहेत. पण भारताविरोधात त्याला साधं अर्धशतकही ठोकता आलेले नाही. भारताच्या गोलंदाजीसमोर बाबर संघर्ष करताना पाहायला मिळतो. आशिया चषकात झालेल्या सामन्यात बाबर आझम फक्त दहा धावा काढून बाद झाला होता. भारताविरोधात सहा एकदिवसीय सामन्यात बाबर आझम याला 30 च्या सरासरीने फक्त 168 धावा करता आल्यात. भारताविरोधात बाबर आझमची सर्वोच्च धावसंख्या 48 इतकी आहे.

भारताविरोधात वनडेमध्ये बाबरची कामगिरी कशी राहिली ?

2017 चॅम्पियन ट्रॉफी- 8 धावा

2017 चॅम्पियन ट्रॉफी- 46 धावा

2018 आशिया कप- 47 धावा

2018 आशिया कप- 9 धावा

2019 वर्ल्ड कप- 48 धावा

2023 आशिया कप – पावसामुळे सामना रद्द झाला

2023 आशिया कप – 10 धावा

विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम फ्लॉप – 

विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवला. श्रीलंका आणि नेदरलँड यांच्याविरोधात पाकिस्तान संघाने बाजी मारली. पण या दोन्ही सामन्यात बाबर आझमला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सामन्यात बाबर आझमची बॅट शांतच राहिली. नेदरलँडच्या विरोधात बाबर आझम 5 धावा काढून तंबूत परतला होता. तर श्रीलंकाविरोधात 10 धावा काढून तंबूत परतला. आता भारताविरोधात होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो? याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Related posts