[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अंतिम सामन्यात रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर WTC चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल. त्याच बरोबर तो भारताच्या अशा कर्णधारांच्या यादीत स्थान मिळवेल ज्यांनी आयसीसीच्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला आयसीसीचे विजेतेपद मिळवता आले नाही. आता रोहितला ही संधी मिळाली आहे, ज्याने तो विराटला मागे टाकू शकेल.
फायनल मॅच आधी रोहित शर्माने संघाचे टेन्शन वाढवले आहे. रोहित शर्माचा फॉर्म फार चांगला नाही. आयपीएलमध्ये त्याने २०.७५च्या सरासरीने ३३२ धावा केल्या आहेत. अर्थात हे अपयश विसरून रोहित दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा आहे. रोहितचा फॉर्म हा काळजीचा विषय असला तरी शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जडेजा या खेळाडूंचा फॉर्म चांगला आहे. इतक नाही तर कसोटी स्टार चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद मिळवले तर आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ देखील संपेल. २०१३ ली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. तेव्हा भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा फायनलमध्ये पराभव झाला. तर २०१५ आणि २०१६च्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९च्या वर्ल्डकपमध्येही असेच झाले होते. तर २०२१, २०२२ मधील टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी निराशजनक झाली. २०२१च्या पहिल्या WTC फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता.
[ad_2]