( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sun Planet Transit In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठरलेल्या वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या या राशीबदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असंच सूर्य देवांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे.
18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी यावेळी आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. जाणून घेऊया नीचभंग राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला लाभ होणार आहे.
कन्या रास (Kanya Zodiac)
नीचभंग राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. कारण सूर्य देव तुमच्या राशीतून धनाच्या प्रवेश करणार आहे. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा दिसून येईल. पद आणि प्रतिष्ठा यांचे फायदे मिळतील. समाजातील लोकांमध्ये तुमचा आदर वाढणार आहे. त्याच वेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. भौतिक सुखसोयी मिळविण्याची तुमची इच्छा वाढणार आहे. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.
धनु रास (Dhanu Zodiac)
नीचभंग राजयोगाची निर्मिती धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही काम किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला मानला जातो. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर रास (Makar Zodiac)
तुम्हा लोकांसाठी नीचभंग राजयोगाची निर्मिती वरदानापेक्षा कमी नसेल. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )