[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
AI vs Human : साधारण गेल्या सात ते आठ महिन्यापासून आर्टिफिशियल इंटिलिजेन्सवर (AI) नवनवीन बातम्या समोर येत आहेत. एआयची ज्या कामासाठी निर्मिती झाली होती त्याउलट समस्या निर्माण होत आहेत. एआयमुळे मानवी जीवन सुखकर व्हावं आणि त्याचा फायदा व्हावा, यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. परंतु आता एआयपासून निर्माण होणाऱ्या समस्या समोर येत आहेत. ओपन एआयच्या ChatGpt सारख्या टूलचा चुकीच्या कामासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचे धोकादायक परिणाम दिसून येत आहेत. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन जगभरातील प्रमुख टेक लिडर्सकडून आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे निर्माण होणाऱ्या भयंकर परिणामाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. OpenAI कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमॅन मायक्रोसॉफ्ट सीटीओ केविन स्कॉट यांच्यासह इतर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी एआय बाबत सावध करताना सांगितले की, आर्टिफिशियल इंटिलिजेन्स समाजासाठी जितके धोकादायक ठरू शकते. हे मानवतेसाठीही तितकेच घातक ठरू शकते.
एआयमुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा कसं तोंड द्याल?
Center for AI Safety या एजेन्सीने एक निवेदन जाहीर केले असून ज्यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी हस्ताक्षर केले आहेत. या निवेदनात आर्टिफिशियल इंटिलिजेन्सच्या नियमनसाठी प्राधान्यक्रम ठरवणे आणि मानवतेचा विचार करून त्याच्यातील संभाव्य धोके दूर करण्यावर भर दिला आहे. या निवेदनात एआयमुळे लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. पुढे या निवेदना सांगण्यात आले की, आपली जागतिक प्राथमिकता संसर्गजन्य रोग आणि आण्विक युद्धासह इतर सामाजिक समस्या आणि एआयमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी असायला हवी.
जेफ्री हिंटन यांनी गुगलची नोकरी का सोडली?
अलीकडेच टेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्व जेफ्री हिंटन यांनी एआयमुळे मानवतेसमोर मोठा धोका असल्याचं सांगत गुगलची नोकरी सोडली होती. अशातच आता टेक क्षेत्रातील इतर दिग्गज लोकांनीही एआयचा धोका ओळखून त्याच नियमन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे एआयमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत एआयवर काम करणाऱ्या लोकांत सामूहिक जाणीव निर्माण होत आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे.
इतर बातम्या वाचा :
Artificial Intelligence : ChatGPT चे CEO Sam Altman यांच्याकडून कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची चिंता व्यक्त, सरकारने हस्तक्षेप करण्याचं आवाहन
[ad_2]