Ambati Rayudu Was Not Treated Well in Team India Anil Kumble Severe Dig at Virat Kohli and Ravi Shastri; टीम इंडियामध्ये अंबाती रायडूवर झाला ‘अन्याय’

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या अंतिम सामन्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अंबाती रायडूने आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. अंतिम फेरीत गुजरातविरुद्ध रायुडूची खेळी सीएसकेसाठी लहान असली तरी सामन्याचा रोख बदलणारी होती. रायुडूने अंतिम सामन्यापूर्वीच ट्विट करत सांगितले होते की आयपीएल २०२३ चा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना असेल. रायुडूच्या निवृत्तीनंतर २०१९ च्या विश्वचषकादरम्यान टीम इंडियामध्ये त्याच्यासोबत काय घडले याची चर्चा अधिक तीव्र चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.रायुडूबद्दल टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार अनिल कुंबळे म्हणाले की विश्वचषक २०१९ मध्ये त्याची निवड न होणं ही मोठी चूक होती. कुंबळे यांनी जिओ सिनेमावरील संवादादरम्यान आपले मत व्यक्त केले. कुंबळेंच्या या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि रवी शास्त्रीही चर्चेत आले आहेत.

२०१९ चा विश्वचषक

२०१९ च्या विश्वचषकात टीम इंडिया कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होत असताना अंबाती रायुडूचे नाव निश्चित केले जात होते. मात्र त्याच्या जागी विजय शंकरचा समावेश करण्यात आला होता. या घटनेनंतर रायुडू खूप निराश झाला आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

या संपूर्ण प्रकरणावर कुंबळे म्हणाले, ‘रायडूला आधी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार करण्यात आले आणि नंतर त्याची संघात निवड झाली नाही, हे पाहून आश्चर्य वाटल्याचे कुंबळे यांनी सांगितले. त्या विश्वचषकादरम्यान भारतामध्ये चौथ्या क्रमांकाच्या स्थानावरून जोरदार भांडण झाले होते. रायुडूचा अनुभव आणि त्याची कामगिरी पाहता त्याची निवड निश्चित असल्याचे मानले जात होते; मात्र त्यानंतर विजय शंकरची निवड करण्यात आली. या संपूर्ण निर्णयात प्रशिक्षक आणि कर्णधाराचीही भूमिका होती.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

रायुडू पुन्हा टीम इंडियात परतलाच नाही

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर रायडू पुन्हा कधीही टीम इंडियामध्ये परत येऊ शकला नाही. विश्वचषक संघात रायुडूच्या जागी विजय शंकरचा टीम इंडियात समावेश करण्यात आला तेव्हा तो 3D खेळाडू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तो स्पर्धेत पूर्णपणे फेल ठरला.

रायुडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो आणि आयपीएलमध्या चेन्नई सुप किंग्जसाठी तीन वेळा विजेतेपद मिळवले. सीएसकेपूर्वी, तो मुंबई इंडियन्सच्या तीन आयपीएल विजेतेपदांमध्ये त्याचा सहभाग होता. रोहित शर्मानंतर सहा वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा तो दुसरा खेळाडू आहे.

[ad_2]

Related posts