अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण पवार यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 

पिंपरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार यांच्या वतीने सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमधील गरजू विद्यार्थ्यांना पेन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, परीक्षा पॅड, वह्या अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

           यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, श्यामभाऊ जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राजू लोखंडे, इंद्रायणी देवकर, उज्ज्वला ढोरे, नितीन सोनवणे, राजेंद्र रणसिंग, शाळेचे प्राचार्य साळवी सर, शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related posts