[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs Bangladesh, World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकात (ICC ODI World Cup 2023) भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) मध्ये टीम इंडिया (Team India) सलग चौथ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना पुण्यामध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Indian Captain Rohit Sharma) मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. बांगलादेश विरोधातील सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आगेत.
बांगलादेश सामन्यात वेगळ्या भूमिकेत?
विश्वचषकात टीम इंडियाने विजयाची हॅटट्रिक मारली आहे. पहिल्या सामन्यात फेल ठरलेल्या रोहित शर्माने त्यानंतरच्या सामन्यामध्ये मात्र, दमदार खेळी करत कमबॅक केलं आहे. आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही कर्णधार रोहित शर्माकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. बांगलादेशसोबतच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार मैदानावर वेगळ्या भूमिकेत दिसला आहे. नेट प्रॅक्टिसदरम्यान रोहित शर्मा गोलंदाजीचा सराव करताना दिसला.
बांगलादेश सामन्याआधी रोहितकडून गोलंदाजीचा सराव
टीम इंडियाने पहिले तीन सामने जिंकून स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा समतोल खूप चांगला आहे. टीम इंडियाकडे शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांसारख्या उत्कृष्ट युवा आणि अनुभवी खेळाडूंची सलामीची जोडी आहे. विराट कोहली आणि केएल राहुलसारखे जगातील सर्वोत्तम फलंदाज मधल्या फळीत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाच्या रूपाने जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूही भारतीय संघाचा भाग आहेत. याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकूरसारखे काही गोलंदाज आहेत, जे मोक्याच्या वेळी चांगली फलंदाजी करू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे जर कशाची कमतरता असेल तर, ती काही फलंदाज जे गरजेच्या वेळी चांगली गोलंदाजी करू शकतील.
सरावादरम्यानचा VIDEO व्हायरल
Today, Captain Rohit Sharma practiced bowling in the nets. pic.twitter.com/6EMs3UXLym
— ROHIT TV™ (@rohittv_45) October 17, 2023
हिटमॅन दुसरी हॅटट्रिक घेण्याच्या तयारीत
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन नेटमध्ये रोहित शर्माला गोलंदाजीचे धडे देत असल्याचे दिसत आहे. टीम इंडियाच्या पुण्यात होणाऱ्या चौथ्या विश्वचषकाच्या सामन्याआधी रोहित शर्माने अश्विनच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचा सराव केला आहे, यावरून येत्या सामन्यांमध्ये कर्णधार गोलंदाजीतही आपली जादू दाखवताना पाहायला मिळू शकतं.
महत्वाच्या इतर बातम्या :
IND vs BAN, Playing 11 : भारताचा विजयी ‘चौकार’? बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11; ‘या’ खेळाडूंना आजमावणार
[ad_2]