World Cup 2023 Ind Vs Ban Rohit Sharma Breaks Ms Dhoni Record Of Scoring More Runs In World Cup One Season

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma Breaks MS Dhoni Record Ind vs Ban: हिटमॅन रोहित शर्माने पुण्यात बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. 48 धावांच्या छोटेखानी खेळीत बांगलादेशच्या गोलंदाजांची पिटाई केली. 257 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने वादळी सुरुवात केली. 48 धावांची खेळी करताना रोहित शर्माने अनेक विक्रम मोडले. यामध्ये माजी कर्णधार एमएस धोनी याच्या विक्रमाचाही समावेश आहे.  बांगलादेशच्या विरोधात पुण्यात 25 धावा करताच धोनीचा मोठा विक्रम रोहित शर्माने मोडला. 

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने 2001 च्या विश्वचषकात 241 धावा केल्या होत्या. तर 2015 मध्ये 237 धावा केल्या होत्या.  रोहित शर्माने (Rohit Sharma) बांगलादेशविरोधात 25 धावा करताच धोनीचा हा विक्रम मोडला आहे.  विश्वचषकाच्या एका हंगमात कर्णधार असताना सर्वाधिक धावा करण्याचा धोनीचा विक्रम आज रोहित शर्माने मोडला आहे. धोनीच्या पुढे आता कपिल देव, सौरव गांगुली आणि विराट कोहलीचा रेकॉर्ड आहे. रोहित शर्माने चार सामन्यानंतर 265 धावा केल्या आहेत. विश्वचषकातील आणखी सामने उर्वरित आहेत. त्या सामन्यात तो कपिल देव, सौरव आणि विराटचा रेकॉर्ड माडू शकतो. 

कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी किती धावा ?

कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने हा विश्वचषक जिंकला होता. कपिल यांनी या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. रोहित शर्माला कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 

कपिल देव आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माकडे साखळी फेरतील अद्याप पाच सामने शिल्लक आहेत. रोहित शर्मा आरामात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 

रोहितची नजर पहिल्या स्थानावर ?

वनडे वर्ल्ड कपच्या एका हंगामात कर्णधार असताना सर्वाधिक धावांचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीने तीन शतकांच्या मदतीने 465 धावा चोपल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने 443 धावा केल्या होत्या. सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत विश्वचषकात 400 धावांचा टप्पा पार करता आला नाही. रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा :

 Rohit Sharma : ‘हिटमॅन’ रोहितचं अर्धशतक हुकले, पण 48 धावांच्या खेळीत बलाढ्य पराक्रमांचा ‘सिक्स’ मारला!

[ad_2]

Related posts