IPL 2023 Champion MS Dhoni Spotted With Bhagavad Gita In Mumbai : IPLच्या विक्रमी विजेतेपदानंतर धोनीच्या हातात श्री भगवद्‌गीता; चेहऱ्यावरील चमक सांगून जाते…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२३चे विजेतेपद मिळवले. गेल्या सोमवारी झालेल्या लढतीत अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव केला. चेन्नईने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत ही लढत ५ विकेटने जिंकली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलच्या सर्वाधिक विजेतेपदाच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली.आयपीएलच्या १६व्या हंगामात धोनीची फलंदाजी म्हणून वैयक्तीक कामगिरी चांगली झाली नसली तरी त्याची गुढघ्याची दुखापत हा चर्चेचा विषय ठरली. अनेक सामन्यात धोनी गुढघ्यावर उपचार घेताना दिसला. दरम्यान आयपीएलचे विजेतपद मिळवल्यानंतर धोनीने चेन्नईवरून थेट मुंबई गाठली आहे.

थरारक विजयानंतर निर्विकार राहिलेल्या धोनीचा बांध फुटला; त्या एका मिठीने डोळ्यात आले पाणी…
हाती आलेल्या माहितीनुसार धोनीवर मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याच्या हातात श्री भगवद्‌गीता दिसते. धोनी एका गाडीत बसला आहे आणि हातातील भगवद्‌गीता दाखवतोय. या फोटोत धोनीच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसते.
गुजरात टायटन्सवर मात केल्यानंतर धोनीने चाहत्यांसाठी आणखी एक हंगाम खेळणार असल्याचे म्हटले होते. जेथे सर्वांना अपेक्षा होती की धोनी निवृत्ती घेईल, पण त्याने तसे केले नाही. माझा प्रयत्न असेल अजून एक हंगाम खेळायचा, मात्र याबाबत अजून निश्चित झाले नाही. हे सर्व त्याच्या फिटनेसवर ठरणार आहे.

MS Dhoni: संघातील या एका खेळाडूमुळे मला पुरस्कार मिळत नाही, विजेतेपदानंतर धोनीने थेट नाव घेतले
धोनीला भलेही फलंदाजीत फार काही योगदान देता आले नसले तरी विकेटकीपर, गोलंदाजीतील बदल आणि फिल्डिंगमधील बदल यामुळे चेन्नईला अनेक सामन्यात विजय मिळून दिला. संघातील कॉम्बिनेशनमुळे त्याने बेन स्टोक्स सारख्या खेळाडूला बेंचवर बसवले होते. गोलंदाजीत दीपक चहर वगळता एकाकडेही अनुभव नव्हता तरी देखील चेन्नईचा संघ विजेता ठरला. सर्वोत्तम संघ नसताना विजेतेपद कसे मिळवता येते हे धोनीने दाखवून दिले.

WTC फायनलमध्ये भारताविरुद्ध आमचा पराभव होईल; ओव्हलवर दाणादाण उडेल, ऑस्ट्रेलियाला वाटते भीती

CSKची IPLमधील कामगिरी

> चेन्नईची आयपीएलमधील विजतेपद-२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३
> उपविजेतेपद- २००८, २०१२, २०१३, २०१५, २०१९
> सर्वाधिक वेळा फायनल खेळणारा संघ
> सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलेला संघ

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts