[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ICC World Cup 2023: रविवारी टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये धर्मशालाच्या मैदानात लढत होणार आहे. दोन्ही संघ स्पर्धेत अजय आहेत, पण धर्मशालाच्या मैदानात एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. न्यूझीलंड संघ गुणतालिकेत सध्या पहिल्या स्थानावर आहे तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. विजेता संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेईलच पण तो सेमीफायनचे तिकिटही जवळपास निश्चित करेल.
न्यूझीलंड आणि भारत या दोघांनीही आपल्या पहिल्या चार सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. परंतु चांगल्या नेट रन रेटमुळे, न्यूझीलंड नंबर-1 वर आहे आणि भारत पॉइंट टेबलमध्ये नंबर-2 वर आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीची लढत होईल, यात शंकाच नाही. धर्मशाला मैदानाची खेळपट्टी कशी असेल आणि या दोन संघाचे कोणते ११ शिलेदार मैदान उतरतील… याबाबत जाणून घेऊयात…
धर्मशाला मैदानाचा पिच रिपोर्ट
धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियम वेगवान गोलंदाजांना मदत करते, पण हे मैदान फलंदाजांसाठीही पोषख आहे. इतर मैदानांपेक्षा हे मैदान लहान आहे, त्यामुळे येथे चौकार-षटकारांचा पाऊसही पडण्याची शक्यता आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फारशी मदत होत नाही, पण वेगवान गोलंदाज त्यांच्या कौशल्याचा फायदा घेऊ शकतात.
सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात या मैदानावर आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 364 धावा आहेत, तर सर्वात कमी धावसंख्या 156 धावांची आहे. याशिवाय पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३१ आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी १९९ धावांची आहे. या मैदानावर दव पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला अधिक फायदा होतो. त्यामुळे कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे दिसते.
सामन्याबाबतची माहिती –
भारत विरुद्ध न्यूझीलंड , आयसीसी विश्व कप 2023, सामना 21
दिनांक आणि वेळ : रविवार, 22 ऑक्टोबर, दुपारी 2 वाजता
ठिकाण : एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
भारताची संभाव्य प्लेईंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शामी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडची प्लेईंग 11: डेवोन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, टॉम लेथम (कर्णधार आणि विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चैपमैन, मिशेल सेंटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन, ट्रेंट बोल्ट
भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सध्या बलाढ्य आहेत. आतापर्यंत हे दोन्ही संघ अजेय राहिलेत. रविवारी जो संघ बाजी मारेल तो उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करेल. कारण या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या 10 संघांना राउंड रॉबिन सामन्यांमध्ये 9-9 सामने खेळायचे आहेत. याआधीचा इतिहास पाहिला तर 5 किंवा 6 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. त्याशिवाय या दोन्ही संघाचा नेट रनरेटही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत रविवारचा सामना जिंकून उपांत्य फेरीचे तिकीट जवळपास निश्चित करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील.
[ad_2]