England Vs South Africa South Africa Hammered 399 Runs Against England Heinrich Klaasen Marco Jansen

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नेदरलँडविरुद्ध मागील सामन्यात दारूण पराभव पत्करलेल्या दक्षिण आफ्रिकेने (England vs South Africa) आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तब्बल 399 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने अक्षरश: इंग्लंडच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करताना 399 धावा कुटल्या.दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब होऊनही आफ्रिकेवर कोणताही परिणाम झाला नाही. चार धावांवर दुसऱ्याच चेंडूवर डिकाॅक बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी रिझा हेंड्रिक आणि वॅन देर दुसेन यांनी 121 धावांची भागीदारी केली. हेंड्रिक 85 धावांवर बाद झाला. दुसेन 60 धावा करून बाद झाला. मारक्रमने 44 धावांचे योगदान दिले. मिलर अवघ्या 5 धावांवर परतला. त्यामुळे 37 व्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेने पाच गडी गमावून 243 धावा केल्या होत्या. 

यानंतर पाचव्या क्रमांकावर क्लासेन आणि सातव्या क्रमांकावर मार्को जानसेन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई करताना धावांचा पाऊस पडला. या दोघांनी शेवटच्या 10 षटकात तब्बल 143 धावाचा पाऊस  पाडत आफ्रिकेला 400 च्या घरात नेऊन ठेवले. शेवटच्या षटकात टिचून गोलंदाज झाल्याने 400 आकडा पार होऊ शकला नाही, अन्यथा आणखी एक 400 चा आकडा याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पार झाला असता.  

यापूर्वी त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 428 धावांचा डोंगर उभा केला होता. ही वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे आज दक्षिण आफ्रिकेकडून सहाव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या वर्ल्डकपच्या इतिहासातील उभारली गेली. 

चालू स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या दहा षटकांमध्येच धावांचा पाऊस पाडून सामना फिरवण्याचा पराक्रम केला आहे श्रीलंकेविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात 137 धावा कुटल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी शेवटच्या 10 षटकात एकूण 79 धावा केल्या होत्या, तर आज हे दोन्ही पराक्रम मोडीत काढत 143 धावा त्यांनी इंग्लंडविरुद्ध कुटल्या. त्यामुळे त्यांचा धावांचा डोंगर उभारला गेला.

या WC मध्ये SA 41-50 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना

137/2 वि. श्रीलंका, दिल्ली
79/4 वि. ऑस्ट्रेलिया, लखनौ
143/2 वि इंग्लंड मुंबई*

एकदिवसीय सामन्यात इंग्लंड विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या

399/7 साऊथ आफ्रिका, मुंबई 2023*
398/5 न्यूझीलंड, ओव्हल 2015
389 वेस्ट इंडिज, ST जॉर्ज 2019
387/5 भारत, राजकोट 2008

विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या

428/5 श्रीलंका विरुद्ध श्रीलंका दिल्ली 2023
417/6 ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान पर्थ 2015
413/5 भारत विरुद्ध बर्म्युंडा पोर्ट ऑफ स्पेन 2007
411/4 साऊथ आफ्रिका विरुद्ध आर्यलँड 2015
408/5 साऊथ आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सिडनी 2015
399/7 साऊथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड मुंबई 2023*

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts