South Africa Leave England World Cup Hopes In Tatters With Crushing Win

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

England vs South Africa : विश्वविजेत्या इंग्लंडचा सलग दुसरा दारुण पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडची तारांबळ उडाली. आठव्या षटकांतच इंग्लंडची 5 बाद 67अशी स्थिती झाली. मार्को जानसेनने दोन झटके दिले, तर नगिडी आणि रबाडाने एक विकेट घेतली. बेन स्टोक्स 5 धावांवर बाद झाला. 4 बाद 38 अशी स्थिती झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बटलरने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण बटलर अवघ्या 15 धावांवर बाद झाला. दहाव्या क्रमांकावर आलेल्या मार्क वूडच्या नाबाद 17 चेंडूतील 43 धावा आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या अॅत्कीनसनच्या 35 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडची अब्रू काहीशी वाचली. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. तत्पूर्वी त्यांची अवस्था 8 बाद 100 झाली होती. 

 

[ad_2]

Related posts