Shubman Gill Needs 14 Runs To Become The Fastest Ever In History To Reach Two Thousand ODI Runs

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धरमशाला : वर्ल्डकपमध्ये (ICC Cricket World Cup 2023) पहिल्या दोन सामन्यांमध्ये डेंग्यूग्रस्त झाल्याने मुकलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकप एन्ट्री केली. पाकिस्तानविरुद्ध त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. मात्र, बांगलादेशविरुद्ध त्याने शानदारी अर्धशतकी खेळी केली. 

गिल वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला भीम पराक्रम करणार! 

शुभमन गिल वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधील महत्वपूर्ण सामन्यात फक्त 14 धावा केल्यानंतर (Shubman Gill needs 14 runs to become the fastest ever in history to reach 2000 ODI runs) वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज होणार आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर आहे. त्याने 40 सामन्यात हा पराक्रम केला होता. 

शुभमन गिलला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजवर कोणालाही न करता आलेल्या वेगाने 2 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. त्याला दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 14 धावांची गरज आहे. त्याने हा पराक्रम आजच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात केल्यास हा पराक्रम त्याच्या नावावर जमा होईल.

 गिलने आतापर्यंत 37 सामन्यात 1986 धावा केल्या आहेत. त्याने 6 शतके झळकावली आहेत, तर 10 अर्धशतके नावावर आहेत. त्याने द्विशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे. त्यामुळे आजच्या गिलच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा असतील. गिलची वनडे क्रिकेटमध्ये  64.06 च्या सरासरीने धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट 102.09 आहे. 



[ad_2]

Related posts