ENG Vs SL ODI World Cup 2023 Match Highlights Oct 26 Sri Lanka Won By 8 Wickets Against England Chinnaswamy Stadium

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ENG vs SL Match Highlights : बंगळूर : 2023 च्या विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडच्या (England) अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेने गतविजेत्या इंग्लंडचा 8 विकेटने (Sri Lanka Beat England)  पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव अवघ्या 33.2 षटकांत 156 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 25.4 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रीलंकेसाठी पाथुम निसांकाने 77 आणि सदिरा समरविक्रमाने 65 धावांची नाबाद खेळी खेळली. गोलंदाजीत लाहिरू कुमाराने श्रीलंकेकडून 3 बळी घेतले.

श्रीलंकेनं मिळवलेल्या विजयानं गुणतालिकेत थेट पाचव्या स्थानी उडी मारली आहे. दुसरीकडे सलग चौथ्या विजयासह इंग्लंड टीम नवव्या स्थानावर गेली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार विश्वविजेत्या इंग्लंडवर आहे. 

श्रीलंकेने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामन्यावर नियंत्रण ठेवले. गोलंदाजीपासून क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीपर्यंत श्रीलंकेने इंग्लंडला एकाही क्षणी वर्चस्व गाजवू दिले नाही. प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडकडून थर्ड क्लास बॅटिंग पाहायला मिळाली. बेन स्टोक्सने संघासाठी 43 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. एकूण 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. श्रीलंकेने आपल्या तगड्या गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना जखडून ठेवले. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. तर रजिथा आणि मॅथ्यूजला 2-2 तर तिक्षनाला 1 यश मिळाले.

श्रीलंकेने दोन गडी लवकर गमावूनही लक्ष्य सहज गाठले

157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 9.4 मध्ये दोन विकेट गमावल्या, ज्यात वेगवान फलंदाजी करणारा कर्णधार मेंडिसचा समावेश होता. इंग्लंडच्या डेव्हिड विलीने दोन्ही यश मिळवून दिले. श्रीलंकेला पहिला धक्का दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सलामीवीर कुसल परेराच्या रूपाने बसला, तो 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सहाव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार कुसल मेंडिस 11 धावा काढून बाद झाला.
यानंतर सलामीवीर पथुम निसांका आणि सदिरा समरविक्रमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 137 धावांची (122 चेंडूत) भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. यादरम्यान, निसांकाने 83 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 77 धावा केल्या आणि सदीरा समरविक्रमाने 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 65 धावा केल्या.

इंग्लंडकडून केवळ डेव्हिड विली 2 विकेट घेऊ शकला. याशिवाय सर्व गोलंदाज विकेट घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. खराब फलंदाजीनंतर गोलंदाजीतही इंग्लंडकडून सुमारा कामगिरी झाली. 

शेवटच्या 5 वर्ल्डकप सामन्यात इंग्लंड विरुद्ध श्रीलंका

2007 – 2 धावांनी विजयी
2011 – 10 गडी राखून विजयी
2015 –  9 गडी राखून विजयी
2019 – 20 धावांनी विजयी
2023 – 8 गडी राखून जिंकला

[ad_2]

Related posts