[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rohit Sharma, IND vs ENG : गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. भारतानं आतापर्यंत पाचपैकी पाचही सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला पाचपैकी बांगलादेशविरुद्धचा केवळ एकमेव सामना जिंकता आला आहे. त्यामुळं भारताला हरवून विश्वचषकातलं आपलं आव्हान टिकवण्याचा इंग्लंडचा प्रयत्न राहिल. तर रोहित शर्माचा भारतीय संघ इंग्लंडला हरवून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. इंग्लंडविरोधात रोहित शर्मा तीन मोठे विक्रम करणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा पल्ला, विश्वचषकात सर्वाधिक षटकार आणि 100 सामन्यात कर्णधार… हे तीन विक्रम रोहितच्या निशाण्यावर आहेत.
1- कर्णधार म्हणून रोहित शर्माचा 100 वा सामना –
रोहित शर्माने 2017 मध्ये पहिल्यांदा टीम इंडियाचे नेतृत्व संभाळले होते. तो तेव्हा नियमित कर्णधार नव्हता. मात्र विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून त्याने भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रविवारी रोहित शर्मा मैदानात उतरताच 100 सामन्यात कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.
2- 47 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,000 धावांचा पल्ला
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 17953 धावा केल्या आहेत. आता त्याला 18,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 47 धावांची गरज आहे. इंग्लंडविरोधात हा पल्ला तो सहज पार करु शकतो. त्यासाठी रोहित शर्माला 47 धावांची गरज आहे. 18,000 आंतरराष्ट्रीय धावा पार करणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय खेळाडू ठरणार आहे. रोहितपूर्वी भारतीय फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी हा आकडा पार केला आहे.
3- विश्वचषकात सर्वाधिक षटकार –
रोहित शर्माने आतापर्यंत पाच सामन्यात 17 षटकार मारले आहेत. विश्वचषकात त्याच्या नावावर 40 षटकारांची नोंद आहे. 2015 ते 2023 यादरम्यान त्याने 40 षटकार मारले आहेत. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमापासून रोहित शर्मा फक्त 10 षटकार दूर आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या यादीत ख्रिस गेल 49 षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडविरोधात रोहित शर्मा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत काढेल.
[ad_2]