Samallest Handbag : पाण्याच्या थेंबापेक्षाही लहान हँडबॅग; किंमत ऐकून वेड लागेल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samallest Handbag : हँडबॅग. महिलांच्या स्टाईल स्टेटमेंटला आणखी उठावदार करणारा एक घटक. तुमच्याआमच्यापैकी अनेकजणी अशाही असतील ज्यांनी ही हँडबॅग वापरली असेल. काहीजणींसाठी तर, ही हँडबॅग म्हणजे त्यांचा लूक पूर्ण करणारी गोष्ट. विविध ब्रँड्सच्या, विविध पद्धतींच्या या हँडबॅग्सच्या किमतीही अगदी तशाच असतात. पण, त्यातही एक जगावेगळी हँडबॅग सर्वांनाच चक्रावून सोडत आहे. 

ही बॅग खरेदी करून नजरेसच पडणार नाही का? असा प्रश्नही अनेकांनाच पडतोय. कारण, ही हँडबॅग पाण्याच्या एका थेंबापेक्षा, मीठाच्या एका कणापेक्षाही लहान आहे.  657 * 222 * 700 मायक्रॉन्सची म्हणजेच साधारण 0.03 इंचांची ही बॅग $63,000 म्हणजेच जवळपास 51 लाख रुपयांना ऑनलाईन लिलावात विकली गेली आहे. 

Louis Vuitton च्या डिझाईनवर आधारित असणारी फ्लोरोसंट ग्रीन या रंगाची ही बॅग न्यूयॉर्कमधील आर्ट कलेक्टिव्हनं तयार केली आहे. लक्झरी ब्रँड नसूनही या इवल्याशा बॅगेमुळं हा ब्रँड सध्या जगभरात सर्च केला जात आहे. 

amazing Handbag smaller than a grain of salt costs around 51 lakh rupees

 

Microscopic Handbag म्हणून ओळखली जाणारी ही हँडबॅग सुईतून धाहा टाकला जातो त्या छिद्रातूनही आरपार जाईल असा दावा ब्रुकलिनच्या MSCHF गटाकडून केला जात आहे. आता राहिला मुद्दा ही बॅग नेमकी कशी साकारण्यात आली त्याबद्दल…. तर तेसुद्धा जाणून घेऊया. 

थ्रीडी प्रिंट मायक्रोस्केल प्लास्टिक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Two photon polymerization तंत्रपाचा वापर या बॅगेच्या निर्मितीसाठी करण्यात आला आहे. या बॅगेला अगदी जवळून पाहिल्यास लक्षात येतंय ती त्यावर Louis Vuitton ब्रँडी आद्याक्षणं, त्यांचा लोगो आहे. टोट बॅगप्रमाणं या बॅगेचं डिझाईन असल्यामुळं अनेक Fashion Freaks तिला पाहून भारावून जात आहेत. 

जेव्हा जवळपास अदृश्य बॅगेचा लिलाव होतो… 

Pharrell Williams या अमेरिकन संगीतकार आणि डिझायनरनं सुरु केलेल्या जूपिटर ऑक्शन हाऊसकडून या बॅगेचा लिलाव करण्यात आला. आता तुम्ही म्हणाल 51 लाख रुपये भरून ती बॅग इतरांना दिसत नसेल तर त्यात काय उपयोग? तर ही बॅग वापरण्याहून जास्त एक कुतूहलाचा आणि आविष्काराचा विषय म्हणूनच खरेदी केली गेली आहे हेच स्पष्ट होतंय. 
 

Related posts