won-by-87-runs-against-bangladesh-kolkata-world-cup-2023-ned-vs-ba | बांगलादेशचं 142 धावांत सपशेल लोटांगण, नेदरलँड्सचा दुसरा विजय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Netherlands vs Bangladesh World Cup 2023 : नेदरलँड्सनं बांगलादेशचा 87 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकाच्या साखळीत दुसरा ऐतिहासिक विजय साजरा केला. या विश्वचषकात नेदरलँड्सनं बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला होता. त्याच नेदरलँड्सनं शकिब अल हसनच्या आता बांगलादेशलाही हरवण्याची कामगिरी बजावली आहे. या सामन्यात नेदरलँड्सनं बांगलादेशला विजयासाठी 50 षटकांत 230 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण नेदरलँड्सच्या प्रभावी आक्रमणासमोर बांगलादेशनं अवघ्या 142 धावांत सपशेल लोटांगण घातलं. पॉल वॅन मेकरननं 23 धावांत चार, तर बास डे लेडेनं 25 धावांत दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, नेदरलँड्सच्या स्कॉट एडवर्डसनं कर्णधारास साजेशी खेळी केली. त्यानं 89 चेंडूंत सहा चौकारांसह 68 धावांची खेळी उभारली.

नेदरलँड्सने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज लिटन दास अवघ्या तीन धावांवर तंबूत परतला.  तंजीद हसन याने 16 चेंडूत 15 धावांचे योगदान दिले. मेहदी हसन मिराज यालाही मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर तो 35 धावांवर बाद जाला. नेदरलँड्सच्या संघाने बांगलादेशच्या संघाला कधीच वरचढ होऊ दिले नाही. ठरावीक अंतराने बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूत धाडले. कर्णधार शाकीब अल हसन याला फक्त पाच धावाच करता आल्या. मुशफिकुर रहीम फक्त एक धाव काढून बाद झाला. मेहदी हसन यालाही फक्त 17 धावांचे योगदान देता आले. त्याने 38 चेंडूचा सामना केला. अखेरीस मुस्तफिजुर रहमान याने 35 चेंडूत  20 धावा जोडल्या तर तस्कीन अहमद याने 11 धावा केल्या. बांगलादेशचा संपूर्ण संघ 42.2 षटकात 142 धावांत बाद झाला.  

नेदरलँड्सचा कर्णधार  एडवर्ड्स याने पुन्हा एकदा महत्वाचं योगदान दिले. त्याने 89 चेंडूमध्ये 68 धावा चोपल्या. यामध्ये त्याने सहा चौकार लगावले. नेदरलँड्सचा सलामी लंदाज विक्रमजीत सिंह याला फक्त तीन धावा करता आल्या. तर मॅक्स ओडोड याला खातेही उघडता आले नाही.  बारेसी याने 41 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. त्याने आठ चौकार ठोकले. एंगलब्रेट याने 61 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. वान बीक याने 16 चेंडूत 23 धावा जोडल्या. त्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावले.  आर्यन दत्त याने 9 धावा केल्या. नेदरलँड्सचा संपूर्ण संघ 229 धावांपर्यंत मजल मारु शकला.  बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याशिवाय इस्लाम आणि तस्कीन अहमद यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  

 

आणखी वाचा :

37th National Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉनमधील निर्विवाद वर्चस्वामुळे महाराष्ट्र अग्रस्थानी!

[ad_2]

Related posts