Team India Six Win World Cup 2023 Shreyas Iyer Shubhaman Gill Rohit Sharma Latest Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India, World Cup 2023 : रोहित शर्माच्या भारतीय संघानं लखनौच्या रणांगणात इंग्लंडवर मिळवलेला विजय शंभर नंबरी होता. भारतानं हा सामना शंभर धावांनी जिंकलाच, पण या विश्वचषकात भारतानं पहिल्यांदाच पूर्वार्धात फलंदाजी करून हा विजय साजरा केला. तसंच भारताच्या हाताशी धावांचं अगदी माफक संरक्षण असतानाही भारतीय गोलंदाजांनी हा विजय खेचून आणला हे विशेष. भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय होय. या विजयानंतर भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला. भारतीय संघाला प्रत्येकजण सध्या विजयाचा दावेदार म्हणत आहे. शोएब अख्तर सारखा दिग्गज रोहित शर्माच्या संघाची तुलना 2003,2007 मधील ऑस्ट्रेलिया आणि 1975-1979 मधील वेस्ट इंडिज संघासोबत करत आहे. भारतीय संघ सध्या भन्नाट फॉर्मात आहे, पण रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटला दोन प्रश्न सतावत असतील. होय… सेमीफायनलआधी याचा तोडगा निघाला नाही तर भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो.

कोणत्या दोन अडचणी ? –

सलामी फलंदाज – 

रोहित शर्मा वगळता दुसऱ्या सलामी फलंदाजाला अद्याप छाप सोडता आली नाही. रोहित शर्मा एका बाजूने खोऱ्याने धावा काढत आहे, पण दुसऱ्या बाजूला हवी तशी कामगिरी करता येत नाही. रोहित शर्माने सहा डावात 398 धावांचा पाऊस पाडला आहे. पण त्याच्या जोडीदारला अद्याप मोठी खेळी करता आली नाही. युवा शुभमन गिल याच्याकडून प्रत्येक भारतीयाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, पण तो त्याला खरा उतरलेला नाही. शुभमन गिल आतापर्यंत चार सामने खेळला आहे. यामध्ये त्याला एकाच सामन्यात अर्धशतक ठोकता आलेय. बांगलादेशविरोधात त्याने 53 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय त्याला मोठी खेळी करता आली नाही. इतर तीन सामन्यात शुभमन गिल याला 30 धावसंख्याही पार करता आली नाही. पहिल्या दोन सामन्यासाठी संधी दिलेला ईशान किशन याला फक्त 47 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाविरोधात तो खातेही उघडू शकला नव्हता. तर अफगाणिस्तानविरोधात 47 धावांचे योगदान दिले होते. सेमीफायनलच्या आधी शुभमन गिल फॉर्मात परतणे टीम इंडियासाठी महत्वाचे आहे. मागील वर्षभरात शुभमन गिल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. या विश्वचषकातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 

चौथा क्रमांक – 

2011 च्या विश्वचषकापासून भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, हे पडलेले कोडे सुटले नाही. 2023 च्या विश्वचषकात टीम इंडियाने श्रेयस अय्यर याला संधी दिली, पण तोही अद्याप शानदार कामगिरी करु शकला नाही. सहा सामन्यात अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरोधात अय्यरने अर्धशतक ठोकले, पण त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. त्याशिवाय इतर सामन्यात अय्यरला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात श्रेयस अय्यर चुकीचा फटका मारुन बाद झाला. बाऊन्सर चेंडूवर अय्यर आपली विकेट फेकतो, हे प्रतिस्पर्धी संघाला आता समजलेय. त्यामुळे सेमीफायनलच्या आधी अय्यर फॉर्मात परतला नाही, तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो. इंग्लंडविरोधात चुकीचा फटका मारुन अय्यर बाद झाल्यानंतर ईशान किशनला संधी देण्याची मागणीही नेटकऱ्यांनी केली होती. 

सलामी फलंदाज – 

ईशान किशन – 

ऑस्ट्रेलिया – 0 धावा

अफगाणिस्तान – 47 चेंडूत 47 धावा

शुभमन गिल – 

पाकिस्तान – 11 चेंडूत 16 धावा

बांगलादेश – 55 चेंडूत 53 धावा

न्यूझीलंड – 31 चेंडूत 26 धावा

इंग्लंड – 13 चेंडूत 9 धावा

चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची कामगिरी – 

ऑस्ट्रेलिया – 0  धावा

अफगाणिस्तान – 23 चेंडूत 25 धावा

पाकिस्तान – 62 चेंडूत नाबाद 53 धावा

बांगलादेश – 25 चेंडूत 19 धावा

न्यूझीलंड –  29 चेंडूत 33 धावा 

इंग्लंड – 16 चेंडूत 4 धावा

[ad_2]

Related posts