Ms Dhoni Record On This Day Most Runs In An Innings By Wicketkeeper Ms Dhoni Smased 183 Innings Today On 31 October 2005 Vs Sri Lanka

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MS Dhoni Record : जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये (Indian Cricket Team Captain) महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ची गणना होते. भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champion Trophy) जिंकणाऱ्या ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) चे नाव भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket History) पुस्तकात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. भारतीय किक्रेट संघ (Indian Cricket Team) चा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) ने 2005 साली आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील (International Cricket) सर्वात मोठी खेळी खेळली होती. या झंझावाती खेळीमुळे तो रातोरात स्टार झाला होता. शतक झळकावल्यानंतर त्याने खास शैलीत सेलिब्रेशनही केलं होतं.  

आजच्या दिवशी धोनीची ऐतिहासिक कामगिरी

धोनीने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झंझावाती शतक झळकावून लक्ष वेधलं. पण, 31 ऑक्टोबर 2005 रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या 183 धावांच्या स्फोटक खेळीमुळे तो खरा स्टार झाला. आजच्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबरला जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर धोनीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 183 धावांची झंझावाती खेळी केली होती. या सामन्यात शतक पूर्ण केल्यानंतर धोनीनं फॉर्म कायम राखला आणि तुफान खेळी केली. धोनीच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी ठरली.

‘कॅप्टन कूल’ची झंझावाती खेळी

धोनीच्या कारकिर्दीतील 183 धावांची तुफानी खेळी

2005 मध्ये, श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी, सात सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसर्‍या सामन्यात, एम एस धोनीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी केली होती. या सामन्यात धोनीने 145 चेंडूत नाबाद 183 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये 15 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. धोनीच्या या शानदार खेळीमुळे टीम इंडियाने 46.1 षटकांत 299 धावांचे लक्ष्य गाठलं आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला. धोनीने आपले शतक पूर्ण करताना बॅट हातात धरून बुलेट फायरिंग स्टाईलने सेलिब्रेशन केले. या शतकानंतर धोनी रातोरात स्टार झाला. धोनीची ही खेळी अविस्मरणीय ठरली.

18 वर्षांनंतरही धोनीचा विक्रम कायम

18 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या गोलंदाजांनी रडकुंडीला आणलं होतं. 31 ऑक्टोबर 2005 रोजी, धोनीने जयपूरच्या सवाईमान सिंग स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 145 चेंडूत 183 धावांची जबरदस्त खेळी खेळली. पहिल्यांदा खेळताना श्रीलंकेने 298 धावांचे लक्ष्य दिले होते. त्या सामन्यात कुमार संगकाराने 138 धावांची शानदार खेळी करत 298 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना धोनीनं नाबाद 183 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.



[ad_2]

Related posts