[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आयपीएलला सुरुवात होण्याआधी धोनी भारतीय टी-२० आणि वनडे संघाचा कर्णधार होता. त्याने २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळून दिले होते. लिलावात धोनीवरील बोली ४ लाख अमेरिकन डॉलरपासून सुरु झाली होती जेव्हा बोली ९ लाख अमेरिकन डॉलरच्यावर गेली तेव्हा फक्त दोन संघ बोली लावत होते, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स. अखेर चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली आणि मुंबईच्या हाती निराशा आली. पण हे झाले तरी कसे?
काय होतो तो आयपीएलमधील नियम?
आयपीएल २००८ मध्ये आयकॉन प्लेअरचा नियम होता. याचा अर्थ लिलावाच्या आधी प्रत्येक संघ आयकॉन खेळाडू निवडू शकत होता. अशा आयकॉन खेळाडूला संघातील सर्वात महाग खेळाडूच्या १५ टक्के जास्त पगार देण्याचा नियम होता. एका संघाकडे ५ मिलिनय इतकी रक्कम होती. इतक्या रक्कमेत सर्व खेळाडूंना खरेदी करायचे होते. मुंबईने सचिन तेंडुलकर, दिल्लीने विरेंद्र सेहवाग, कोलकाताने सौरव गांगुली, बेंगळुरूने राहुल द्रविड आणि पंजाबने युवराज सिंगला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले. चेन्नई सुपर किंग्जकडे आयकॉन खेळाडू नव्हता.
धोनीला खरेदी करण्याच्या काही वेळ आधी संघाचे मालक श्रीनिवासन यांनी सांगितले की, अचानक मुंबई इंडियन्स धोनीला खरेदी करण्यासाठी १.५ मिलियन डॉलरपर्यंत आली. तेव्हा त्यांना जाणीव झाली असावी की आयकॉन खेळाडूला सर्वात महाग खेळाडूच्या १० टक्के अधिक द्यावे लागतात. यामुळे त्याचे ३ मिलियनहून अधिक रक्कम गेली असती आणि हातात काहीच राहिले नसते. यामुळे धोनी चेन्नई संघात आला.
चेन्नई सुपर किंग्जने महेंद्र सिंह धोनीला पहिल्याच हंगामात कर्णधार केले. संघ अंतिम फेरीत पोहोचला पण राजस्थान रॉयल्सकडून त्यांचा पराभव झाला. २०१० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद मिळवले. पुन्हा २०११ त्यानंतर २०१८, २०२१ आणि आता २०२३ मध्ये संघ चॅम्पियन झाला.
[ad_2]