After Diwali Lord of Business Mercury will rise The fortune of these zodiac signs will be bright there will be progress in business

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Uday In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी दिवाळीनंतर अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहेत. ज्यामध्ये बुध ग्रहाचा विशेष समावेश आहे 

ग्रहांचा राजकुमार बुध वृश्चिक राशीत उदय होणार आहे. 13 नोव्हेंबरला रोजी बुध ग्रहाचा उदय होणार आहे. अशा स्थितीत बुधाचा उदय सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाचा उदय कोणत्या राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बुध ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात उदय होणार आहे. त्यामुळे या वेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. तुमचा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि रिअल इस्टेटशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.  नोकरदार लोकांना पद आणि प्रतिष्ठा मिळेल. शिवाय आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होईल. 

कुंभ रास (Kumbh Zodiac)

बुधाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. कुंडलीतील उत्पन्नाच्या घरावर बुध ग्रहाचा उदय होणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. तसेच तुमच्या कामात आतापर्यंत जे अडथळे येत होते ते दूर होऊ शकतात. तुम्हाला मालमत्तेद्वारे नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. 

तूळ रास (Tula Zodiac)

बुध ग्रहाचा उदय आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुम्ही एखाद्याला दिलेले कर्ज परत मिळवू शकता. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असणार आहे.  वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीतही लाभ होतील आणि यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही सुवर्ण संधी मिळू शकतात. तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts