Reliance Jio Launches JioMotive To Turn Normal Car To Smart Car Check Price Features Other Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :   मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने (Reliance Jio) पोर्टेबल ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) डिव्हाइस ‘JioMotive’ लाँच केले आहे. या उपकरणाच्या मदतीने कोणतीही जुनी कार काही मिनिटांतच स्मार्ट कारमध्ये रुपांतरीत होईल. जिओ मोटिव्ह डिव्हाईसमध्ये अँटी-थेफ्ट अलर्ट, अँटी-टॉ अलर्ट, जिओ फेन्सिंग, रिअल टाइम लोकेशन डिटेक्शन आदी  फीचर्स आहेत. 

किंमत किती? 

JioMotive ची किंमत 4999 रुपये आहे आणि रिलायन्स डिजिटल, Jio आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. वापरकर्ते कोणत्याही री-वायरिंगशिवाय त्यांच्या कारमध्ये या स्मार्ट फीचर्सचा समावेश करू शकतात. JioMotive हे प्लग-अँड-प्ले डिव्हाइस आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळ्या पद्धतीने इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही.  iOS युजर्स अॅप स्टोअरवरून JioThings अॅप डाउनलोड करू शकतात आणि Android युजर्स Google च्या Play Store वरून JioThings अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतात. 

कारमध्ये हे उपकरण बसवून वापरकर्ते वाहनाची सुरक्षा वाढवू शकतील. JioMotive खरेदी केल्यावर एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते, तर एका वर्षानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

या डिव्हाईसचे फीचर्स काय आहेत?

या डिव्हाईसचे अनेक फीचर्स आहेत. त्यातील काही महत्त्वांच्या फीचर्सवर एक नजर…

अँटी-थेफ्ट अलर्ट:  कार चोरीला जात असल्यास युजर्सला अलर्ट मिळेल.

अँटी-टॉ अलर्ट: कार टो केली जात असल्यास त्याचा अलर्ट मिळले. 

डिव्‍हाइस टँपर अलर्ट:  हे डिव्‍हाइस काढून टाकल्‍यावर किंवा ते काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यावर युजर्सला त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनवर तातडीने अलर्ट मिळू शकतो. 

रिअल-टाइम व्हेईकल ट्रॅकिंग: या फीचर्समुळे तुमची कार ट्रॅक करता येई शकते. 

कार वाय-फाय : या डिव्हाईसमुळे तुम्हाला कार वायफायची सुविधा मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल तिथे तुम्हाला हायस्पीड वायफाय मिळेल. 

जिओ फेन्सिंग: या फीचर्समुळे युजर्सला आपली कार एका विशिष्ट अंतरापर्यंत गेल्यास तुम्हाला अलर्ट मिळतो. जिओफेन्सिंगमध्ये व्हर्च्युअल झोन सेट करणे समाविष्ट आहे. तुमची कार एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रवेश करते किंवा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळतो. तुम्हाला या विशिष्ट मर्यादेत कारची अॅक्टिव्ही पाहता येऊ शकते.

अॅक्सिडेंट डिटेक्शन : कारचा अपघात झाल्यास युजर्सला त्यांच्या स्मार्टफोनवर रिअल-टाइम अलर्ट मिळू शकते.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts