[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
BAN vs SL Match Report : बांगलादेशनं श्रीलंकेवर तीन विकेट्सनी मात करून, वन डे विश्वचषकात आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली. बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघांचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळं त्या दोन संघांमधला सामना ही निव्वळ औपचारिकता होती. या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचं आव्हान दिलं होतं. नजमल हुसेन शान्तो आणि शाकिब अल हसननं तिसऱ्या विकेटसाठी रचलेल्या १६९ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बांगलादेशनं त्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. शान्तोनं ९० धावांची, तर शाकिबनं ८२ धावांची खेळी उभारली. त्याआधी, चरिथ असालंकानं झळकावलेल्या शतकानं श्रीलंकेला सर्व बाद २७९ धावांची मजल मारून दिली होती. विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदाच श्रीलंकेचा पराभव केला.
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशला पहिला धक्का बसला तो १७ धावांवर. सलामीवीर तनजीद हसन 5 चेंडूत 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तनजीद हसनला दिलशान मधुशंकाने बाद केले. बांगलादेशला दुसरा धक्का 41 धावांवर बसला. लिटन दास 22 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. दिलशान मधुशंकानेही लिटन दासला आपला शिकार बनवले. बांगलादेशच्या दोन विकेट झटपट गेल्या. पण त्यानंतर अनुभवी शाकीब अल हसन आणि शान्तो यांनी डावाला आकार दिला. यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि नजमुल हुसेन शांतो यांच्यात १६९ धावांची मोठी भागीदारी झाली. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शान्तोने सर्वाधिक धावा केल्या. नजमुल हुसेन शान्तोने 101 चेंडूत 90 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार मारले. त्याशिवाय कर्णधार शाकीब अल हसनने 65 चेंडूत 82 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार मारले.
श्रीलंकेसाठी दिलशान मधुशंका सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत 69 धावांत 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. याशिवाय अँजेलो मॅथ्यूज आणि महिश तिक्षणा यांना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. रजिथा व्यतिरिक्त दुष्मंथा चमीरा आणि धनंजय डी सिल्वा यांना यश मिळाले नाही.
बांगलादेशच्या विजयानंतर गुणतालिकेत किती बदल झाला?
श्रीलंकेचा पराभव करत बांगलादेशचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पराभवानंतर श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर घसरला आहे. बांगलादेशचे 8 सामन्यांत 4 गुण आहेत. श्रीलंकेचेही 8 सामन्यांत 4 गुण झाले आहेत, मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे बांगलादेश सातव्या स्थानावर आहे.
[ad_2]