Australia Vs South Africa In The Semi Finals India Vs Pakistan Nz Afg Of 2023 World Cup Latest Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WC Semi Final 2023 : ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी द्विशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर सेमीफायनलमध्ये पोहचणारा ऑस्ट्रेलिया तिसरा संघ ठरलाय. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे, ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघामध्येच दुसरा सेमीफायनलचा सामना होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ गुणतालिकेत 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचा सेमीफायनलचा सामना चौथ्या स्थानावरील संघासोबत होणार आहे. पण चौथा संघ अद्याप निश्चित झालेला नाही. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यापैकी एक संघ चौथ्या स्थानावर जाण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलिया-आफ्रिकामध्ये सेमीफायनल – 

ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका संघाचे अद्याप एक एक सामने शिल्लक आहेत. या दोन्ही संघांनी उर्वरित सामन्यात विजय मिळवला तर ते 14 गुणांपर्यंत जाऊ शकतात. या दोन्ही संघाचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला तरी त्यांचे 12 गुण राहतात. अशा स्थितीमध्ये ते पहिल्या क्रमांकावर आणि चौथ्या क्रमांकावर जाणार नाहीत. त्यामुळे या दोन्ही संघामध्ये सेमीफायनलची दुसरी लढत निश्चित होणार आहे. 

कधी आणि कुठे होणार सामना ?

विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. पण पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये पोहचला तर यांच्यातील लढत मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर होईल. हा सामना दुपारी 2 वाजता होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होणार आहे. 

भारताची सेमीफायनल कोणत्या संघासोबत ?

भारतीय संघाने आठ सामन्यात आठ विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय संघासोबत चौथ्या क्रमांकाचा संघ भिडणार आहे. यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघामध्ये स्पर्धा सुरु आहे. या तिन्ही संघाचे आठ सामन्यात आठ गुण आहेत. या तिन्ही संघाला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी विजय गरजेचा आहे. जर तिन्ही संघाने विजय मिळवला तर नेटरनरेटवर चौथा संघ ठरवला जाईल. न्यूझीलंडचा पुढील सामना श्रीलंकासोबत आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरोधात भिडणार आहे. तर आफगाण संघासोबत आफ्रिकेचे आव्हान असेल. या तीन संघापैकी एका संघासोबत भारताचा सामना होणार आहे. 

भारताचा सेमीफायनल सामना कुणासोबत – 

भारतीय संघ गुणतालिकेत असल्यामुळे पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअवर 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारताविरोधात पाकिस्तानचा संघ असेल तर हा सेमीफायनलचा सामना कोलकात्याला होणार आहे. पण जर दुसरा संघ असेल तर हा सामना वानखेडे स्टेडिअमवरच रंगणार आहे.  हा सामना दुपारी 2 वाजता होईल. त्याआधी अर्धा तास नाणेफेक होणार आहे. 

[ad_2]

Related posts