[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs PAK World Cup 2023 Semifinal Chances : भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरतील स्थान निश्चित केलेय. तर इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि नेदरलँड्स या चार संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनंतर चौथा संघ उपांत्य फेरीत कोणता पोहचणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघामध्ये एका जागेसाठी स्पर्धा सुरु आहे. पाकिस्तान संघ चौथ्या स्थानावर पोहचला तर भारतासोबत सामना रंगणार आहे.
पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांचा रनरेट कमी आहे. पण नशीबाची साथ असेल तर पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमीफायनलचे गणित अतिशय सोपे आहे. पाकिस्तान संघाला आठ सामन्यात आठ गुण मिळाले आहेत. ते पाचव्या क्रमांकावर विराजमान आहेत. न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान हे संघही आठ गुणांसह या स्पर्धेत आहेत. तिन्ही संघाकडे एक एक सामना शिल्लक आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये जाण्याचे नेमकम गणित काय?
भारत-पाकिस्तान सेमीफायनलचं गणित नेमकं काय ?
सर्वात महत्वाचे, पाकिस्तानला आपल्या अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करावा लागेल. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 11 नोव्हेंबर रोजी सामना होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा श्रीलंकेकडून आणि अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव व्हावा लागेल. अशा स्थितीत पाकिस्तान संघाला थेट चौथ्या क्रमांकावर प्रवेश मिळेल. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा अखेरच्या साखळी सामन्यात पराभव झाला तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल.
अखेरच्या सामन्यात न्यूझीलंड जिंकले तर….
अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचा विजय झाला, तर पाकिस्तानला इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. न्यूझीलंडच्या सामन्यानंतर पाकिस्तानचे सेमीफायनलचे गणित स्पष्ट होईल. जर श्रीलंकेला न्यूझीलंडने हरवले तर पाकिस्तानला मोठ्या फरकाने सामना जिंकावा लागेल, जेणेकरुन न्यूझीलंडपेक्षा त्यांचा रनरेट चांगला होईल. अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानचा रनरेट आधीच चांगलाय.
तिन्ही संघांनी अखेरचे सामने गमावले तर….
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांचा अखेरच्या सामन्यात पराभव झाला. तर ज्या संघाचा रनरेट चांगलाय, तो सेमीफायनलसाठी पात्र होईल. अशा स्थितीत पाकिस्तानला कमीतकमी फरकाने पराभव स्विकारावा लागेल. तर न्यूझीलंड मोठ्या फरकाने सामना गमावेल, अशी प्रार्थना करावी लागेल.
वरील सर्व समीकरणे जुळून आली तरच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सेमीफायनलची लढत होईल.
[ad_2]