[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
दोन्ही संघातील पहिली वनडे २ जून रोजी झाली. या लढतीत फगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा ६ विकेटनी पराभव केला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजीकरत २६९ धावांचे आव्हान उभे केले होते. अफगाणिस्तानने विजयाचे लक्ष्य १९ चेंडू आणि ६ विकेट राखून पार केले.
अफगाणिस्तानला मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून दिला तो २१ वर्षीय इब्राहिम जादरान याने होय. इब्राहिमने ९८ धावांची शानदार खेळी केली. त्याचे शतक फक्त २ धावांनी हुकले. त्याचे शतक झाले असते तर वनडेच्या छोट्या करिअरमध्ये त्याचे चौथे शतक ठरले असते. सध्या धमाकेदार फॉर्ममध्ये असलेल्या इब्राहिमने या खेळीत भारताचा स्टार आणि युवा फलंदाज शुभमन गिलचा रेकॉर्ड मोडून काढला.
२१ वर्षीय इब्राहिमने २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४ कसोटी, ९ वनडे खेळल्या आहेत. कसोटीत इब्राहिमची सरासरी ४४.५ अशी आहे. त्याने ३ अर्धशतकांसह ३५६ धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये ६६.४च्या सरासरीसह ५३१ धावा केल्या आहेत. ज्यात ३ शतक आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. इब्राहिमने बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतक केले होते. अर्धशतक करणारा तो सर्वात युवा फलंदाज ठरला होता.
श्रीलंकेविरुद्ध ९८ धावांची खेळी करून इब्राहिमने वनडे क्रिकेटमध्ये फक्त ९ डावात ५०० धावांचा टप्पा पार केला. वनडेत सर्वात वेगाने ५०० धावांचा टप्पा पार करणारा तो संयुक्तपणे दुसरा खेळाडू ठरला आहे. इब्राहिमने भारताच्या शुभमन गिलचा विक्रम मागे टाकला. गिलने १० डावात ५०० धावा केल्या होत्या. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान अव्वल स्थानी आहे. त्याने फक्त ७ डाववात ५०० धावा केल्या होत्या.
[ad_2]