[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ICC Rankings 2023 : आयसीसी क्रमवारीत (ICC Cricket Rankings) भारतीय खेळाडूंचाच (Indian Cricketer) बोलबाला दिसून येत आहे. भारतीय फलंदाज (Indian Batsman) आणि गोलंदाजांनी (Indian Bowler) आयसीसी क्रमवारीत (ICC Rankings) बाजी मारली आहे. आयसीसी क्रमवारीत टेस्ट (Test Cricket) आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये (ODI Cricket) भारत (Team India) पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Player Rankings) भारताचा युवा स्टार शुभमन गिल (Shubhman Gill) अव्वल फलंदाज आहे आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) गोलंदाजीत पहिल्या क्रमांकावर आहे. अश्विन (R. Asghwin) टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज आहे.
कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडू अव्वल
भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेटसोबतच कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमध्येही अव्वल आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. शुभमन गिल आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे, तर गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर आहे. याशिवाय रवी अश्विन कसोटी फॉरमॅटमध्ये नंबर-1 गोलंदाज आहे. तर रवींद्र जडेजा कसोटी फॉर्मेटमध्ये नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे. सूर्यकुमार यादव हा T20 फॉरमॅटमध्ये नंबर 1 फलंदाज आहे.
आयसीसी क्रमवारी पाहा
No.1 Test team – India.
No.1 ODI team – India.
No.1 T20I team – India.
No.1 ODI batter – Gill.
No.1 ODI bowler – Siraj.
No.1 Test bowler – Ashwin.
No.1 Test all rounder – Jadeja.
No.1 T20I batter – Surya.This is domination. 🇮🇳 pic.twitter.com/gDzBUJFdKP
— Johns. (@CricCrazyJohns) November 8, 2023
आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा
भारताचा सलामीवीर शुभमन गिल वनडे क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल होता, मात्र आता शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकले आहे. आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाजांचे वर्चस्व कायम आहे. शुभमन गिलशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा टॉप-10 फलंदाजांमध्ये समावेश आहे. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.
विश्वचषक टीम इंडियाची विजयी वाटचाल
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाची शानदार कामगिरी सुरु आहे. भारतीय संघाने स्पर्धेत सलग 8 सामने जिंकले असून गुणतालिकेत पहिले स्थान पटकावत उपांत्य फेरीत आपले स्थान नक्की केलं आहे. भारतीय संघाता शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध रंगणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]