( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indian Railway Jobs 2023: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही सुविधांची आखणी केली जाते. प्रवासादरम्यान या सुविधांचा लाभ अनेकांनाच घेता येतो. याच रेल्वे विभागाकडून आता नोकरीची संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या भारतीय रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी आता सुवर्णसंधी तुमच्यापर्यंत चालून आली आहे.
उत्तर पूर्व रेलवे, गोरखपुर, भर्ती बोर्डानं एनईआर आरआरसी गोरखपुर अंतर्गत या नोकरभरतीची जाहिरात केली होती. याच जाहिरातीच्या आधारे तुम्हासा ner.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोकरीसाठीचा अर्ज करता येणार आहे. तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर, अर्ज करण्यासाठी मात्र घाई करावी लागेल, कारण आज अर्ज स्वीकारण्याचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळं ही संधी सोडू नका.
रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गोरखपूरमध्ये ज्युनिअर टेक्निकल असोशिएट या पदासाठी 37 जागांवर ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. या मोहिमेअंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असोशिएट (इंजिनिअरिंग) ची 19 पदं, ज्युनिअर टेक्निकल असोशिएट (सिग्नल) ची 9 पदं आणि ज्युनिअर टेक्निकल असोशिएट (इलेक्ट्रीकल) च्या 9 पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे.
काय आहे वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता?
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 वर्षे इतकं असावं. आरक्षित प्रवर्गांसाठी मात्र वयोमानाच्या अटीमध्ये सूट देण्यात आली आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीसुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
नोकरीसाठी इच्छुक असणारे अर्जदाक एका मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवी शिक्षण परीक्षेत उत्तीर्ण असावेत. अर्जदारांमधील General Category या विभागात येणाऱ्यांना किमान 60 टक्के गुण असावेत. तर, ओबीसी, एनसीएल प्रवर्गांसाठी ही मर्यादा 55 टक्के इतकी आहे. एससी/ एसटीसाठी ही मर्यादा 50 टक्के इतकी आहे.
किती मिळणार पगार?
रेल्वेमधील या नोकरीसाठी निवड झाल्यास कॅटेगरी X मधील अर्जदारांना 30 हजार रुपये इतकं वेतन मिळणार आहे. तर, कॅटेगरी Y आणि कॅटेगरी Z विभागाला अनुक्रमे 27000 आणि 25000 रुपये इतकं वेतन मिळणार आहे.